CCTV | कॅशियर केबिनबाहेर जाताच संधी साधली, बँक ऑफ इंडियाच्या शाखेत टेबलवरुन 16 लाख लंपास

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असताना 16 ते 17 लाखांची रक्कम लांबवली.

CCTV | कॅशियर केबिनबाहेर जाताच संधी साधली, बँक ऑफ इंडियाच्या शाखेत टेबलवरुन 16 लाख लंपास
बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 7:47 AM

चंद्रपूर : बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या धाडसी चोरी (Bank Of India) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतील सर्व कर्मचारी उपस्थित असताना चोरट्यांनी तब्बल 16 ते 17 लाख रुपयांच्या रकमेवर डल्ला (Bank Robbery) मारला. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वरोरा शहरात भरदिवसा ही घटना घडली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास बँकेत दोघे चोरटे शिरले. यावेळी कॅशियर ब्रांच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेल्याची संधी साधून त्यांनी केबिनमधील टेबलवरुन रक्कम लांबवल्याचं समोर आलं आहे. पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून चोरांनी पोबारा केला. बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन संशयित आरोपी कैद झाले आहेत. विशेष म्हणजे बाजारपेठेतील कॅमेरात दोघा जणांसोबत एक तरुणीही दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. आरोपींनी बँकेची रेकी करत चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असताना 16 ते 17 लाखांची रक्कम लांबवली.

कॅशियर मॅनेजरच्या केबिनमध्ये गेल्याची संधी

दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बँकेत 2 व्यक्ती शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. कॅशियर मॅनेजरच्या केबिनमध्ये कामानिमित्त गेल्याची संधी साधून केबिनमधे शिरत त्यांनी थेट टेबलवरून ही रक्कम लांबवली.

दोघा तरुणांसोबत तरुणीही सीसीटीव्हीत कैद

500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून चोरांनी साळसूदपणे बँकेबाहेर पोबारा केला. बाजारपेठ आणि बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये 2 संशयित आरोपींसोबत एक तरुणीही कैद झाली आहे.

चक्रावून टाकणाऱ्या या घटनेनंतर वरोरा पोलिसांसोबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आरोपींनी बँकेची रेकी करत चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुढे चोर, मागे पोलीस, अखेर बाइक सोडली, तलावात उडी मारली, हिंगोलीतल्या बंदुकधारी चोरांचा थरार….

मुंबईतील SBI बँक शाखेत दरोडा आणि हत्या, दोघा आरोपींना काही तासात अटक

केरळातील बँकेवर दरोडा प्रकरण, साताऱ्यातून साडेतीन किलो चांदीसह एक जण केरळ पोलिसांनी घेतला ताब्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.