Gadchiroli | प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला, गडचिरोलीत माजी सरपंचाचा मुलगा गजाआड

अल्पवयीन युवतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात मन्नेराजाराम लगतच्या गेर्रा येथील अल्पवयीन तरुणी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती.

Gadchiroli | प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला, गडचिरोलीत माजी सरपंचाचा मुलगा गजाआड
गडचिरोलीत प्रेयसीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:04 AM

गडचिरोली : प्रेयसीची हत्या करणारा (Girlfriend Murder) प्रियकर अखेर गजाआड झाला आहे. अल्पवयीन मुलीची हत्या करुन प्रियकराने तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित युवती चार दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र तिचा खून करुन मृतदेह जमिनीत पुरल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी प्रियकर (Boyfriend) हा माजी सरपंचाचा मुलगा आहे. मोबाईल लोकेशनवरुन तपास करत पोलिसांनी आरोपी अविनाश मडावी याला तेलंगणात बेड्या ठोकल्या आहेत. मयत अल्पवयीवन मुलीसोबत अविनाशचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नेमक्या कुठल्या कारणावरुन ही हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन युवतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात मन्नेराजाराम लगतच्या गेर्रा येथील अल्पवयीन तरुणी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. नंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला होता.

माजी सरपंचाचा मुलगा आरोपी

अल्पवयीन युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला. या प्रकरणात माजी सरपंचाचा मुलगा आरोपी आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी तेलंगणात राज्यात टीम पाठवली होती.

तेलंगणातून प्रियकाराला अटक

अखेर मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी आरोपी अविनाश मडावी याच्या मुसक्या आवळल्या. तेलंगणाच्या करीमनगर इथून प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

आरोपी अविनाशचे मृत तरुणीशी प्रेम प्रकरण सुरु होते. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला

दोन लग्नं मोडली, आता लिव्ह इन पार्टनरने घात केला, मुंबईत 29 वर्षीय महिलेची हत्या, 42 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.