एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या, ट्यूशनहून परतताना भररस्त्यात खून

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तरुणाने निर्घृण हत्या केली. 18 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर हातोडीने वार करुन तिचा जीव घेण्यात आला.

एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या, ट्यूशनहून परतताना भररस्त्यात खून
चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:53 PM

गोंदिया : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या (Student Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तरुणाने निर्घृण हत्या केली. हातोड्याने वार करत तरुणाने विद्यार्थिनीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Crime) रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडली आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कित्येक वर्षांपासून प्रेमासाठी तरुणीच्या मागे तगादा लावत होता, मात्र तिने काहीच उत्तर न दिल्यामुळे संतापून त्याने तिची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर हातोडीने वार करत आरोपीने स्वतःलाही जखमी करुन घेतले होते, मात्र लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.

काय आहे प्रकरण?

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तरुणाने निर्घृण हत्या केली. 18 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर हातोडीने वार करुन तिचा जीव घेण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

एकतर्फी प्रेमातून तगादा

ट्यूशनवरुन परत येत असताना काळ आपली रस्त्यात वाट पाहत आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. आरोपी कित्येक वर्षांपासून प्रेमासाठी तिच्यामागे तगादा लावत होता, मात्र तरुणीकडून या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून संतापलेल्या आरोपीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपीचे स्वतःवरही वार

हत्या केल्यानंतर आरोपीला गावातील लोकांनी घेराव घातला. लोकांचा जमाव पाहता आरोपीने स्वतःवरही हातोडीने वार करत जखमी करुन घेतले होते, मात्र लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पुढील तपास रावणवाडी पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या :

सूरतमध्ये एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीची हत्या, वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट

यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर शेतात जीवघेणा हल्ला

एकतर्फी प्रेमातून 9 वीच्या विद्यार्थीनीची हत्या, मुंबईपासून 118 किमीवर मृतदेह नेऊन जाळला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.