AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जांभळाच्या झाडाला तरुणाचा गळफास, शेजारी रिकामा फास, ऐनवेळी कोणी माघार घेतली?

ज्या जांभळाच्या झाडाच्या फांदीवर तरुणाने गळफास घेतला, त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते. त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे याचा मृतदेह लटकलेला होता तर दुसरा गळफास रिकाम्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला

जांभळाच्या झाडाला तरुणाचा गळफास, शेजारी रिकामा फास, ऐनवेळी कोणी माघार घेतली?
गोंदियात तरुणाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 3:13 PM
Share

गोंदिया : ऐन दिवाळीच्या काळात युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 25 वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात घडली आहे. कैलास रामलाल कोचे असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरींचे दोन गळफास असल्याने दोघे जण एकाच वेळी आत्महत्या करत असल्याच्या शंकेला उधाण आले आहे.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात राहणारा 25 वर्षीय कैलास दिवाळीच्या दिवशी कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता घरुन निघून गेला होता. रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन गेल्यानंतरही तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली, त्यावेळी फुटाना ते कलुसावटोला पायदान रस्त्यालगत असलेल्या जांभळीच्या झाडावर कैलास गळफास घेतलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला.

एकाच झाडाला दोन फास

विशेष म्हणजे ज्या जांभळाच्या झाडाच्या फांदीवर तरुणाने गळफास घेतला, त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते. त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे याचा मृतदेह लटकलेला होता तर दुसरा गळफास रिकाम्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला. तसेच त्याचा मोबाईल खिशात न ठेवता झाडाखाली ठेवलेला होता.

कैलाससोबत कोणी माघार घेतली, गावात चर्चा

त्यामुळे कैलाससोबत आत्महत्या करणारी आणखी कोणी व्यक्ती होती का, असल्यास कोण, अशा एक ना अनेक चर्चा गावात सुरु झाल्या आहे. याबाबत पोलीस स्टेशन चिचगड येथे फिर्याद नोंद करण्यात आली असून फौजदारी कलम 174 अन्वये पुढील तपास चिचगड पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या :

वड्याचं तेल वांग्यावर, वाद लोकलमधील प्रवाशांशी, हत्या फूटपाथवर झोपलेल्या दोघांची

फेसबुक लाईव्ह करत 40 ते 50 बाटल्या सिरप प्यायला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा थरारक बचाव

लक्ष्मीपूजनावेळी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, कुटुंबातील पाच जण जखमी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.