Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी प्रकरण, दहशतवादी रईस शेखचा मोबाईल जप्त, कोणाकोणाच्या संपर्कात?

रईस ज्या हॅाटेलमध्ये थांबला होते, तिथे नेऊन एटीएसने त्याची चौकशी केली. रईसचा स्थानिक हस्तक कोण आहे, याचा शोध सुरु आहे. सध्या दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी प्रकरण, दहशतवादी रईस शेखचा मोबाईल जप्त, कोणाकोणाच्या संपर्कात?
नागपूर संघ कार्यालयाची अतिरेकीकडून रेकीImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 7:46 AM

नागपूर : जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (Nagpur RSS Headquarters) आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याप्रकरणी जैशचा दहशतवादी (Terrorist) रईस अहमद शेख सदाउल्ला शेखचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाईलद्वारे रईसने कुठे कुठे कोणाशी संपर्क साधला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रईसचा मोबाईल नागपूर दहशतवादविरोधी पथकाने (Nagpur ATS) सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. काही दिवसांपूर्वीच एटीएसने काश्मीरमधून त्याचा ताबा मिळवला होता.

रईस ज्या हॅाटेलमध्ये थांबला होते, तिथे नेऊन एटीएसने त्याची चौकशी केली. रईसचा स्थानिक हस्तक कोण आहे, याचा शोध सुरु आहे. सध्या दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 15 जुलैला नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मीरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

संघ बिल्डिंग आणि हेडगेवार स्मृती भवनाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला काश्मीरमधून दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशीही सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रईस अहमद शेख असदुल्ला शेख (वय 26 वर्ष, रा. खाटी अवंतीपोरा, पुलवामा) असल्याचे सांगण्यात आले.

जैशच्या हस्तकाची सूचना

पाकव्याप्त काश्मीरमधून जैशचा हस्तक उमरच्या सांगण्यावरून रईस जुलैमध्ये नागपुरात आला होता. संघाची दोन्ही प्रमुख ठिकाणे पाहिल्यानंतर ते काश्मीरला परतले. सप्टेंबर 2021 मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.

संशय टाळण्यासाठी युक्ती

मिलिटरी इंटेलिजन्स टीमने चौकशी केली असता, रईसने जुलैमध्ये नागपूरला गेल्याचे सांगितले होते. कोणीही त्याच्यावर संशय घेऊ नये, म्हणून श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशी फ्लाईट बुक करण्यात आली होती. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रिक्षाने संघ भवन आणि तिथून हेडगेवार भवनला तो गेला होता.

दोन्ही ठिकाणांची रेकी करून मोबाईलवर व्हिडीओ तयार करून त्याने तो उमरला पाठवला. यानंतर नागपूर पोलिसांचे आणि महाराष्ट्र एटीएस आणि आयबीला माहिती मिळाली. एका पथकाने श्रीनगरला जाऊन त्याची चौकशीही केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास नागपूर एटीएसकडे सोपवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणले होते.

वाईट कॉलिटीच्या व्हिडीओमुळे ओरडा

यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की पाकव्याप्त काश्मीरमधून उमरच्या सूचनेनुसार रईस येथे रेकी करण्यासाठी आला होता. नागपूरला पोहोचल्यानंतर एक व्यक्ती संपर्क करेल, असे उमरने त्याला सांगितले होते. त्याच्या मदतीनेच त्याला रेकीचे काम करावे लागणार होते, मात्र तो नागपूरला पोहोचला तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. अशा परिस्थितीत त्याने स्वत: दोन्ही ठिकाणी जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. व्हिडिओ निकृष्ट दर्जाचे होते आणि ते दुरुन घेतले गेले. त्यामुळे उमरने त्याला फटकारले पण भीतीपोटी त्याने पुन्हा व्हिडीओ काढला नाही आणि फोन बंद केला.

मात्र रईस केवळ तपास यंत्रणांची दिशाभूल करत असल्याचं बोललं जातं. त्याने दोन्ही ठिकाणांचा बारकाईने मागोवा घेतला आणि पीओकेमध्ये बसलेल्या जैशच्या हँडलरला सर्व माहिती शेअर केली. रईसच्या मदतीसाठी नागपुरात कोणाला पाठवले जाणार होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत सध्या संपूर्ण गुप्तता पाळण्यात येत आहे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.