भरधाव कार कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली, दोघी मैत्रिणींचा मृत्यू, दोन मित्र गंभीर

नागपूरच्या सतरंजीपुरा आणि इतवारी परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींचा कार अपघातात मृत्यू झाला. नागपूरमधील अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटल्यानंतर कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली.

भरधाव कार कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली, दोघी मैत्रिणींचा मृत्यू, दोन मित्र गंभीर
नागपुरात कार उलटून अपघात
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 9:41 AM

नागपूर : कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात नागपुरातील दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघात इतका भीषण होता की कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चौघे जण होते, त्यापैकी दोन मैत्रिणींना प्राण गमवावे लागले, तर दोन मित्र जखमी झाले आहेत.

नागपूरच्या सतरंजीपुरा आणि इतवारी परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींचा कार अपघातात मृत्यू झाला. अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरमधील अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटल्यानंतर कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली.

नेमकं काय घडलं?

मृत तरुणी आणि जखमी तरुण हे मित्र होते. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चौघे जण एमएच 31 ईवाय 8899 क्रमांकाच्या बोलेरो कारने वाडी येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण झाल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास चौघेही जण घरी येण्यास निघाले.

चिराग कार चालवत होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सीटवर बसल्या होत्या. चिराग हा वेगात कार चालवत होता. भरतनगर येथील पंजाब नॅशनल बँकेजवळून येत असताना चिरागचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडाला धडकली. त्यानंतर कार बाजूलाच असलेल्या घराच्या कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली.

औरंगाबादेत आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवरच प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

अंबरनाथमध्ये 12 सप्टेंबरला संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

नाशकात टेम्पोला अर्टिगाची धडक

दरम्यान, अस्थी विसर्जन केल्यानंतर गावी निघालेला टेम्पो रस्त्यात थांबला असताना अर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हा अपघात झाला. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.