2016 मधील हत्याकांडातून पुराव्याअभावी सुटलेल्या गुंडाची नागपुरात हत्या

2016 मधील एका हत्याकांडात पुराव्या अभावी गमछु नावाच्या गुंडाची निर्दोष मुक्तता झाली होती. गुंडाचा काही जणांशी वाद सुरु होता, त्यातून ही हत्या झाली असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

2016 मधील हत्याकांडातून पुराव्याअभावी सुटलेल्या गुंडाची नागपुरात हत्या
नागपुरात गुंडाची हत्या
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 9:17 AM

नागपूर : नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली. हत्या करुन मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

2016 मधील एका हत्याकांडात पुराव्या अभावी गमछु नावाच्या गुंडाची निर्दोष मुक्तता झाली होती. गुंडाचा काही जणांशी वाद सुरु होता, त्यातून ही हत्या झाली असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात गमछूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरु करुन आरोपींचा शोध चालू केला आहे.

वर्ध्यात तीन सराईत गुन्हेगार हद्दपार

दुसरीकडे, तीन सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. सण, उत्सव काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

प्रसाद ऊर्फ यश नीलेश पराते (रा. न्यू रेल्वे कॉलनी), अंकुश गजानन तिरपुडे (रा. हिंदनगर), अंकित ऊर्फ अनिकेत वाटकर अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. तिन्ही गुन्हेगार रामनगर परिसरात दहशत पसरवत असून अवैध दारुची विक्री आणि वाहतूक करतात. तसेच साक्षीदारांना धमकावणे, त्यांना जीवे ठार मारणे किंवा जीव घेण्याचा प्रयत्न करणे आदी विविध गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

जेलमधून सुटलेल्या गुंडाची विटांनी हत्या

दरम्यान, एका कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी नागपूरच्या पांढरबोडी भागात घडली होती. अक्षय जयपुरेवर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तो सहा महिन्यांआधी जेलमधून बाहेर आला होता. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

नागपुरात गुंडाची दगडाने ठेचून हत्या

दुसरीकडे, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी नागपुरात समोर आली होती. मृत विजय विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो शहरातील शांती नगर भागातील आपल्या साथीदारांसोबत हप्ता वसुली करायचा. याविषयी अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त जमावाने त्याला जीवे मारलं

संबंधित बातम्या :

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

नागपुरात ‘लेडी डॉन’ची हत्या, भरचौकात चाकूचे सपासप वार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.