Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 कोटी 20 लाखांच्या हवालाच्या पैशांचा तपास ईडीकडे? नागपूर पोलिसांचं पत्र

नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत शुक्रवारी तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम हवालाची असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून उघड झालं होतं. पोलिसांच्या पथकाने धाड टाकून ही रक्कम जप्त केली होती.

4 कोटी 20 लाखांच्या हवालाच्या पैशांचा तपास ईडीकडे? नागपूर पोलिसांचं पत्र
नागपुरात हवालाचा पैसा ताब्यातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 3:35 PM

नागपूर : नागपुरातील हवाला रकमेचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे (ED) जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नागपुरातील व्यापाऱ्याकडून पोलिसांनी जवळपास सव्वा चार कोटी रुपयांची रोकड (Hawala Money) जप्त केली होती. या रकमेचा ईडीने तपास करावा, यासाठी नागपूर पोलिसांनी (Nagpur Crime) ईडीला पत्र लिहिल्याची माहिती आहे. हवाला व्यापारी नेहाल सुरेश वडालिया याच्याकडे रक्कम आढळली होती. एका आरोपीच्या व्हॅाट्सॲपवर हवाला रकमेबाबत चॅट सापडलं होतं.

काय आहे प्रकरण?

नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत शुक्रवारी तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम हवालाची असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून उघड झालं होतं. पोलिसांच्या पथकाने धाड टाकून ही रक्कम जप्त केली होती.

तीन व्यापारी ताब्यात

नागपूर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घातला. पोलिसांनी तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलं होतं. या घटनेनं शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोंदियाहून आलेला पैसा नागपूरला

दरम्यान, हा पैसा गोंदिया येथून आला होता. नागपूर आणि आसपासच्या व्यापाऱ्यांकडे तो जाणार होता, असं बोललं जात आहे. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. नेहाल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकार आणि शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल अशी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्यांची नावं आहेत.

या रकमेचा ईडीने तपास करावा, यासाठी नागपूर पोलिसांनी ईडीला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे आता अंमलबजावणी संचलनालय या प्रकरणाचा तपास करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

संबंधित बातम्या :

अबबबबबबब… नोटाच नोटा! नागपुरात हवालाचा पैसा सापडला, मोजता-मोजता दमछाक

Nagpur Crime : नागपूरमध्ये गोंडवाना एक्स्प्रेसमधून 42 किलो गांजा जप्त

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.