मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या पतीने रिअल इस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर चाकू हल्ला केला. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे महिला आणि तिच्या बॉसचे प्राण वाचले.
नागपूर : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला (Husband Attacks Wife) करण्याचा प्रयत्न केला. बायकोच्या ऑफिसमध्ये जाऊन नवऱ्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पत्नीचा जीव वाचला. परंतु या हल्ल्यात महिलेचा बॉस (Boss) जखमी झाल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या (Nagpur Crime) इममवाडा परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने आरोपी पती हा पत्नी काम करत असलेल्या कार्यालयात गेला होता. मात्र तिच्यावर हल्ला करताना कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने विवाहिता वाचली. मात्र या नादात महिलेच्या वरिष्ठांना दुखापत झाली आहे. आरोपी नवऱ्याला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रमेश भीमराव वाघ असं आरोपीचं नाव आहे.
काय आहे प्रकरण?
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या पतीने रिअल इस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर चाकू हल्ला केला. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे महिला आणि तिच्या बॉसचे प्राण वाचले. नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. रमेश भीमराव वाघ (वय 38 वर्ष. रा. कुतूबशाह नगर, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर शंका
रमेशची पत्नी इमामवाडा येथील रिअल इस्टेट कार्यालयात मॅनेजर पदावर कार्यरत आहे. रमेशविरोधात काही काळापूर्वी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीमुळेच हा गुन्हा दाखल झाल्याचा संशय रमेशला होता. याशिवाय पत्नीच्या चारित्र्यावरही तो सातत्याने शंका घेत असे.
बायकोवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने रमेश सोमवारी दुपारी दोन वाजता पत्नीच्या ऑफिसमध्ये गेला. पत्नीला शिवीगाळ करत तो वाद घालू लागला. काही समजण्याच्या आतच त्याने चाकू काढून पत्नीवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने टेबलचा आधार घेत स्वतःला वाचवले.
बॉस गंभीर जखमी
यावेळी कार्यालयातील अधिकारी संजय सोनारकर (वय 52 वर्ष) तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी रमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रमेशने सोनारकरांवरही हल्ला केला. चाकूचे वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रमेशला पकडले. पोलिसांनी रमेशला अटक करुन खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीची हत्या करण्याच्याच उद्देशानेच रमेश कार्यालयात आला होता. मात्र, बॉस सोनारकर आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे त्याचा डाव फसला. पत्नीने दुसऱ्यांच्या सांगण्यावरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्यामुळे चिडल्याचा दावा रमेशने केला आहे.
संबंधित बातम्या :
दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या
आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण, जुहू पोलिसात परस्परांविरोधात तक्रार दाखल