पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

प्रदीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या पत्नीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन आरोपी पंजू तोतवानी याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाला अटकImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 8:56 AM

नागपूर : मध्यमवयीन व्यक्तीच्या आत्महत्येनंतर (Suicide) तीन दिवसांनी त्यांच्या मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. त्यामुळे आपल्या पतीने त्याला होणाऱ्या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याचं पत्नीला समजलं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपुरात (Nagpur Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोपळनगरमध्ये 21 फेब्रुवारीला ही घटना घडली होती. प्रदीप मारवाडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. गळफास घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली होती. मात्र तोपर्यंत कुटुंबीयांना त्यांनी आपली जीवनयात्रा का संपवली, याचं नेमकं कारण समजलं नव्हतं.

काय आहे प्रकरण?

प्रदीप मारवाडे यांच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारीला प्रदीप यांच्या मुलीच्या बॅगमध्ये प्रदीप यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. त्यात आरोपी पंजू तोतवानी याच्या नावाचा उल्लेख होता. पंजूने आर्थिक गोष्टीवरुन होणाऱ्या मानसिक त्रासावरून आत्महत्या करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं.

सुसाईड नोटच्या आधारे कारवाई

पती प्रदीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या पत्नीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन आरोपी पंजू तोतवानी याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

राजकीय नेत्यांशी स्नेहसंबंध

पंजू तोतवानी याच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच विविध राजकीय नेत्यांशी त्याचे स्नेहसंबंध असल्याचं बोललं जातं. याचाच फायदा घेऊन तोतवानी लोकांना त्रास देत असल्याचा दावा केला जात आहे.

प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात तोतवानीला अटक करुन मयत आणि आरोपीचे काय संबंध आहे, कुठल्या कारणांमुळे आत्महत्या केली याचा तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

प्रेयसीच्या घरी प्रियकराची आत्महत्या; बसमध्ये ओळख, पण शेवट नाशिकमधल्या रस्त्यावर बेवारस

सोलापुरात माजी महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

आधी 49 वा मजला गाठला, मग 26 व्या मजल्यावर आले, मुंबईत वरिष्ठ बँक अधिकाऱ्याची आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.