Nagpur Detonators | नागपूर रेल्वे स्टेशनबाहेर जिवंत स्फोटकांची बॅग, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे एक बेवारस बॅग पोलीस कर्मचाऱ्यालाच आढळून आली होती. याविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले
नागपूर : गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात (Nagpur Railway Station) काल (सोमवारी) रात्री जिवंत स्फोटकांची बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. तपास यंत्रणांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. जिलेटिनच्या 54 कांड्या (gelatin sticks and detonators) असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू (Bomb Scare) आढळली होती. या रंगाची बॅग कोणाच्या हातात होती, हे सीसीटीव्हीच्या आधारे शोधले जात आहे. जिवंत स्फोटकांची बॅग वेळीच सापडल्याने मोठा अनर्थ टळला.
A bag with 54 gelatin sticks and detonator was found outside the main gate of the #Nagpur railway station @NagpurPolice said. A policeman spotted the unclaimed bag lying near the traffic police booth. @nagpurcp @maharashtra_hmo @NitinRaut_INC @Dev_Fadnavis @nitin_gadkari pic.twitter.com/9i9KOXh3mx
हे सुद्धा वाचा— Praveen Mudholkar (@JournoMudholkar) May 9, 2022
नेमकं काय घडलं?
नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे एक बेवारस बॅग पोलीस कर्मचाऱ्यालाच आढळून आली होती. याविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅग ताब्यात घेतली असता त्यात चक्क जिलेटिनच्या कांड्या एकमेकांशी सर्किटने जोडलेल्या स्वरुपात आढळल्या होत्या. पोलिसांनी बॉम्बसदृश्य वस्तू ताब्यात घेत पोलीस मुख्यालय परिसरात नेली.
तपास यंत्रणा अलर्टवर
नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची माहिती मिळताच श्वान पथक, BDDS पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारावरील आणि समोरच्या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग ताब्यात घेऊन विशेष गाडीने पोलीस मुख्यालयात नेली.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. तपास यंत्रणांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे.