बेपत्ता वडिलांची तक्रार करायला तरुण पोलिस स्टेशनला, समोर दिसला बाबांचा मृतदेह
मुलगा आपले 53 वर्षीय वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेला, तर मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
नागपूर : वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला गेलेल्या मुलावर भयावह दृश्य पाहण्याची वेळ आली. पोलीस स्टेशनला गेलेल्या मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. ड्रायव्हर म्हणून काम करणारे मुलाचे वडील काही तासांपासून बेपत्ता होते. नागपुरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मुलगा आपले 53 वर्षीय वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेला, तर मुलाला वडिलांचा मृतदेह दिसला. नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
झाडीझुडपात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
नागपुरातील वाहन चालक अरुण घरडे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. सोमवारी रात्रीपासून ते बेपत्ता झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. नागपूरच्या आऊटर रिंग रोड परिसरातील झाडीझुडपात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
“बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोलनाक्याजवळ हा मृतदेह सापडला. त्याच वेळी एक मुलगा पोलीस स्टेशनला वडील हरवल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी त्याला मृतदेहाचे वर्णन करुन सांगितले असता, तो वडिलांचाच मृतदेह असल्याची ओळख त्याने पटवली. वडिलांना दारु पिण्याची सवय असल्याचं सांगितलं” अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे संशयास्पद मृत्यू असल्याने पोलीस हत्येच्या दिशेने तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
दसऱ्याच्या दिवशी एक कोटी 18 लाखांचं ‘सोनं लुटलं’, पुण्यातील चोरटा राजस्थानात जेरबंद
हिडन कॅमेरावर पासवर्ड रेकॉर्ड, पंजाबच्या बारावी पास तरुणाचा पुण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न