नागपुरात तरुणाची गळा चिरून हत्या, यशोधरा नगरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना

रविवारी रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालयाच्या समोर हे हत्याकांड घडलं.

नागपुरात तरुणाची गळा चिरून हत्या, यशोधरा नगरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 8:28 AM

नागपूर : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या सलग दोन दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारु पिण्याच्या वादातून चुलत भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरात ताजी असताना दुसऱ्याच दिवशी वर्चस्व वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी रात्री नागपुरात वर्चस्वाच्या वादातून तिघांनी एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी जवळ असलेल्या गणेश भोजनालयाच्या समोर हे हत्याकांड घडलं. आवेश खान पठाण असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तीनही मारेकरी फरार झाले आहेत.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसाची पथके रवाना

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांनी मारेकऱ्यांबाबत माहिती काढली असून पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सलग दोन दिवस हत्येच्या घटना

धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवारी रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.

नागपुरात फ्रेंडशिप डेला हत्या

फ्रेंडशिप डेच्या वेळी झालेल्या वादातून 21 वर्षीय अनिकेत भोतमांगे या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार नागपुरात दोन आठवड्यांपूर्वी उघडकीस आला होता. फ्रेंडशिप डेला झालेल्या भांडणानंतर नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात मित्रांनी अनिकेतची हत्या केल्याचा आरोप झाला होता. अनिकेत हा विंडो फ्रेमिंगचे काम करायचा.

अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाची हत्या

दुसरीकडे, गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात नागपुरात उघडकीस आली होती. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. राजू नागेश्‍वर असे मृताचे नाव होते, तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाने सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं

गुरु-शिष्याचे बारा वर्ष प्रेमसंबंध, महिलेचे अन्यत्र सूत जुळले, नागपुरात शिष्याकडून हत्या

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.