धारदार शस्त्राने वार करुन नागपुरात युवकाची हत्या, तरुणीच्या छेडछाडीवरुन हत्येचा संशय
कमलेशने काही दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे. या कारणावरुन त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागपूर : नागपुरातील हत्यांचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरुन युवकाची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे.
नेमकं काय घडलं?
धारदार शस्त्राने वार करुन युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडल्याची माहिती आहे. कमलेश बंडू सहारे असे मयत तरुणाचे नाव आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात ही घटना घडली.
छेड काढल्याचा आरोप
कमलेशने काही दिवसांपूर्वी तरुणीची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे. या कारणावरुन त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. कमलेशची हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरात फ्रेंडशिप डेला हत्या
फ्रेंडशिप डेच्या वेळी झालेल्या वादातून 21 वर्षीय अनिकेत भोतमांगे या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार नागपुरात दोन आठवड्यांपूर्वी उघडकीस आला होता. फ्रेंडशिप डेला झालेल्या भांडणानंतर नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात मित्रांनी अनिकेतची हत्या केल्याचा आरोप झाला होता. अनिकेत हा विंडो फ्रेमिंगचे काम करायचा.
अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाची हत्या
दुसरीकडे, गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात नागपुरात उघडकीस आली होती. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. राजू नागेश्वर असे मृताचे नाव होते, तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाने सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप झाला होता.
संबंधित बातम्या :
पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं
नववीतील मुलगी, अकरावीतील मुलगा, हाताला हात बांधून दोघांची आत्महत्या