पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोरच होमगार्ड तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरात उपचार
वर्धेच्या पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत रात्रीच्या सुमारास एका होमगार्ड तरुणीने अंगावर पेट्रोल घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तरुणी गंभीररित्या भाजल्याने तिला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
वर्धा : वर्ध्यातील पोलीस वसाहतीत होमगार्ड तरुणीने स्वतःला पेटवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या घराच्या दारासमोर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत भाजल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मात्र तिने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
काय आहे प्रकरण?
वर्धेच्या पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत रात्रीच्या सुमारास एका होमगार्ड तरुणीने अंगावर पेट्रोल घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तरुणी गंभीररित्या भाजल्याने तिला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तरुणीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर स्वतःला पेटवल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार वर्ध्याच्या आदिवासी कॉलनी परिसरात पिपरी मेघे येथील पोलीस वसाहत तरुणीने स्वतःला पेटवून घेतले. तरुणीने स्वतःला पेटवल्याची बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत तरुणी 70 ते 80 टक्के भाजली असल्याची माहिती असून तिला नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे अद्याप कळू शकलं नसून विविध चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या :
प्रेम केलं म्हणून संदीपचा जीव गेला? काठीनं जीव जाईपर्यंत संदीपला मारलं, उपचारादरम्यान दगावला!
माझं लग्न झालंय, तू मला विसर, ब्रेकअप केलेल्या प्रेयसीवर प्रियकाराचा Acid Attack, पण जखमी झाली सासू!
स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल