महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, शिवसेना नेते संजय राठोड जबाब नोंदवणार
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी तक्रारदार महिलेचा जबाब यवतमाळमधील घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. आता राठोडांचीही बाजू ऐकली जाईल
यवतमाळ : शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपा प्रकरणी उद्या जबाब नोंदवला जाणार आहे. राठोडांविरोधात पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्याला पोस्टाने तक्रार पाठवली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली असून उद्या खुद्द आमदार संजय राठोड यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी तक्रारदार महिलेचा जबाब आधीच घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. संजय राठोड यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर एसआयटी समिती दोन्ही जबाब तपासून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर माध्यमांना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
संजय राठोड यांचा दावा काय?
संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत. राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणात आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात. राजकारणात पाय ओढण्याचा प्रयत्न होत आहे. मीडिया आणि सोशल मीडियात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा बातम्यामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रकार आहे, असं राठोड म्हणाले.
काय आहेत आरोप?
शिवसेना नेते संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार एका महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय pic.twitter.com/4ZFQU6NGHt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 12, 2021
संबंधित बातम्या:
संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार