कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

पतीने चाकूने वार करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. दारुच्या नशेत कौटुंबिक कारणावरुन पती नेहमी पत्नीला मारहाण करत असल्याचा दावा केला जात आहे

कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या
आरोपी प्राध्यापक पती आणि मयत पत्नीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:46 PM

यवतमाळ : पतीने पत्नीची हत्या (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने राहत्या घरी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पती मारोती अरके हा व्यवसायाने प्राध्यापक (Professor Husband) आहे. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान यवतमाळच्या (Yawatmal Crime) शासकीय रुग्णालयात विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी मारोती अरके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. दारुच्या नशेत कौटुंबिक कारणावरुन पती नेहमी पत्नीला मारहाण करत असल्याचा दावा केला जात आहे. विमल मारोती अरके असे मयत महिलेचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

यवतमाळ जिल्ह्यात आर्णी शहरातील स्वामी समर्थ नगर मध्ये रहिवासी असलेले प्राध्यापक मारोती आरके हे लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांना नियमित मध्यपानाची सवय असल्याने घरी रोजच पत्नी विमल सोबत भांडण करायचे.

रविवारी दि. 13 मार्च रोजी हे भांडण विकोपाला गेले. दुपारी प्राध्यापक मारोती आरके यांनी पत्नी विमल आरके हिच्या गुप्त अंगावर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये विमल ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान रात्री एकच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

मृत विमलला आठ आणि पाच वर्षांची दोन लहान मुले आहेत. प्राध्यापक मारोती आरके यांने स्वत: पोलीस स्टेशनला गुन्हा झाल्याचे सांगून आत्मसमर्पण केले आहे. शिक्षण क्षेत्राला कलंक लावणारी घटना असून या घटनेचा शिक्षण वर्गाकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.

संबंधित बातम्या :

गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ कसं उकललं?

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.