आजी-आजोबांची तब्येत बिघडलेय, अल्पवयीन मुलीला भुलवून नेत लैंगिक अत्याचार
तुझ्या आजी-आजोबांची प्रकृती बिघडली आहे. तू आमच्यासोबत काचेवाणीला ये, अशी फूस लावत आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला नागपूरहून पळवून आणले. तिच्यावर गोंदियात लैंगिक अत्याचार करण्यात आले
गोंदिया : आजी-आजोबांची तब्येत बिघडल्याचं खोटं सांगून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. ईसायत सलीम शाह (वय 19 वर्ष, रा. फकिरटोली, काचेवाणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
तुझ्या आजी-आजोबांची प्रकृती बिघडली आहे. तू आमच्यासोबत काचेवाणीला ये, अशी फूस आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला लावली होती. तिला नागपूरहून पळवून आणून आरोपीने सडक अर्जुनी येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने घरी पोहोचल्यावर संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबाने लागलीच डुग्गीपार पोलिसांत याची तक्रार दाखल केली.
आरोपीला अटक
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीचा शोध सुरु केला. अखेर आरोपी ईसायत सलीम शाह याला सालेकसा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध कलम 363, 376(2), (आय)(जे)(एन), 506 भा.द.वि. सहकलम 4,6 पॉस्को कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, वकील मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, डॉक्टर पतीसह तिघे पसार
सासू-सासरे लग्नाला गेले, घरात पती-पत्नी, मोठा वाद उफाळला, त्याने बायकोचा जीवच घेतला, नेमकं काय घडलं?
(Minor girl assaulted in Gondia after falsely told about Grandparents health)