पॅरेलिसीस आणि पैशांच्या चणचणीने ग्रासलं! नागपुरातील नवरा-बायकोची गळफास घेत आत्महत्या

Nagpur Couple Suicide : आत्महत्या करणाऱ्या नवरा बायकोचं नाव मनोज लोधी आणि ममता लोधी असं आहे.

पॅरेलिसीस आणि पैशांच्या चणचणीने ग्रासलं! नागपुरातील नवरा-बायकोची गळफास घेत आत्महत्या
आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 12:30 PM

नागपूर : नागपुरात एका दापम्त्यानं आत्महत्या (Nagpur Couple Suicide) केली. गळफास लावून घेत या दाम्पत्यानं आपलं आयुष्य संपवलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 45 वर्षांचा नवरा आणि 40 वर्षांच्या बायकोनं जीव दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईट नोटच्या मदतीनं नागपूर पोलीस (Nagpur Police News) आत्महत्याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नागपूपच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक (Nagpur Crime News) घडली आहे. कोरोना महामारीचा आर्थिक फटका, सोबत आजारांनी ग्रासलेलं असल्या कारणां या दाम्पत्यानं आयुष्य संपवलं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नवरा-बायकोच्या आत्महत्येनं नागपूरच्या कळमना भागात सगळ्यांना धक्का बसलाय.

आत्महत्या करणारे नवरा-बायको कोण?

आत्महत्या करणाऱ्या नवरा बायकोचं नाव मनोज लोधी आणि ममता लोधी असं आहे. मनोज हे 45 वर्षांचे होते, तर त्यांची पत्नी ममताचं वय 40 होतं. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या अंतर्ग येणाऱ्या गौरी नगर इथं नवरा बायकोनं गळफास लावून आपली जीवयात्रा संपवली.

पॅरोलिसीस आणि आर्थिक अडचणी

मनोज लोधी जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. हे दाम्पत्य मूळचं गोंदिया येथील आहे. कोविड काळात त्यांच्या व्यवसायाला मोठा फटक बसला. दरम्यान त्यांचा मनोज याला पॅरेलिसिस झाला होता. प्रकृतीसाठी खर्च, व्यवसायातील अडचणी आणि राहण्यासाठी चिंता, अशा तिहेरी संकटात सापडल्यामुळे आता जगायचं कसं, असा प्रश्न या दाम्पत्यासमोर उभा राहिला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा महत्त्वाची बातमी : Video

आधीच पैशांचा चणचण असताना, त्यात घरमालकाने सतत भाडं आणि पाणी बिलाच्या रकमेसाठी तगादा लावला होता. त्यामुळं लोधी दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये यासंदर्भात पोलिसांना उल्लेख आढळले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. एकूणच या प्रकारानं नागपुरात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.