पोलीस स्टेशनसमोरच चालकाचा ट्रकला गळफास, चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतर आत्महत्या

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने आपल्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

पोलीस स्टेशनसमोरच चालकाचा ट्रकला गळफास, चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतर आत्महत्या
ट्रकला गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 12:17 PM

नागपूर : पोलीस स्टेशनसमोरच ट्रकला गळफास घेऊन ट्रक चालकाने आत्महत्या केल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रक चालकाने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे. (Nagpur Crime Truck Driver allegedly hangs himself to Vehicle after FIR in robbery case)

ट्रक चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने आपल्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीच्या आरोपाखाली काल रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये त्याच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.

नेमकं काय घडलं

अशोक जीतूलाल नागोत्रा (वय 40) असे त्या ट्रकचालकाचे नाव आहे. अशोक नागोत्रा चालवत असलेल्या ट्रकमधून 9 जूनला नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंपाजवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. घटनेच्या दिवशी अशोक नागोत्रा त्यांच्या ट्रकमध्ये तेलाचे पिंप घेऊन येत असताना ही घटना घडली होती.

ट्रक मालकाची पोलिसात तक्रार

ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात पाच दिवसानंतर म्हणजे काल कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा सापडले नव्हते.

ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह

मंगळवारी सकाळी मात्र अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या :

गाडीच्या सर्व्हिसिंगवरुन भांडण, बापानेच झाडल्या मुलावर गोळ्या, उपचारादरम्यान मृत्यू

15 वर्षीय राज पांडेचं अपहरण करुन हत्या, राजने गायलेल्या ‘आयेगी मेरी याद’ गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी

(Nagpur Crime Truck Driver allegedly hangs himself to Vehicle after FIR in robbery case)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.