AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर मृत्यू प्रकरण, नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोज ठवकर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली

पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर मृत्यू प्रकरण, नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित
नागपुरात ड्रग्ज तस्करांनी हातपाय पसरले; एकाला अटक करून 5 किलो गांजा जप्त
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 8:34 AM
Share

नागपूर : नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र आता पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध

मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं होतं.

हॉस्पिटलबाहेर मोठा जमाव

पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरात तणाव होता.

संबंधित बातम्या :

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तपास सीआयडीकडे, तिघा पोलिसांची बदली

(Nagpur Man Manoj Thawkar beaten up by Police PSI and three others Suspended)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.