रस्त्यातून अधिकाऱ्याचे अपहरण, कारमध्ये टाकून मारहाण, कारण काय?

सक्करदरा परिसरातून निघालेली कार व्हेरायटी चौकापर्यंत पोहोचली. आरोपी आणि हर्षल इंगळे यांच्यामध्ये चांगली झटापट झाली.

रस्त्यातून अधिकाऱ्याचे अपहरण, कारमध्ये टाकून मारहाण, कारण काय?
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 8:58 PM

नागपूर : मेट्रोचे अधिकारी हर्षल इंगळे हे सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील मिताली बारजवळ उभे होते. तेवढ्यात मागून एक लाल रंगाची कार आली. या कारमधील आरोपींनी हर्षल इंगळे यांना त्या कारमध्ये टाकले. कारमध्ये त्यांना जोरदार मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेली सोन्याची चैन आणि इतर मौल्यवान साहित्य हिसकावले. पैशाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी आणि अधिकारी यांच्यात झटापट

सक्करदरा परिसरातून निघालेली कार व्हेरायटी चौकापर्यंत पोहोचली. आरोपी आणि हर्षल इंगळे यांच्यामध्ये चांगली झटापट झाली. त्यात हर्षल इंगळे कारमधून बाहेर पडले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध

त्यानंतर गुन्हे शाखा पोलीस आणि सकरदरा पोलीस यांनी पथक तयार केला. आरोपींचा शोध सुरू केला. बॉबी धोटे हा आरोपी असल्याचं इंगळे यांनी सांगितले. पोलिसांना चेहरा लगेच लक्षात आला. त्यांनी आपले सूत्र कामाला लावत शोध सुरू केला.

बॉबी धोटेसह दोघांना अटक

बॉबी धोटे हा जयताळा परिसरातील एका हॉटेलमध्ये बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये पोहोचत त्याला घेरलं. बॉबी धोटेसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे तपास अधिकारी सुनील ठवकर यांनी दिली.

या प्रकरणानंतर नागपुरात मोठी चर्चा उफाळून आली. आता भर रस्त्यातून अशा प्रकारे अपहरण होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेत. मात्र ही घटना कुठल्या वादातून झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हर्षल इंगळे यांनी दोन नंबरचे पैसे तर कमावले नाहीत, अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण केली जाऊ शकते, या दिशेने पोलीस शोध घेत आहेत.

बॉबी धोटे कुख्यात आरोपी

नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्याचं अपहरण करून लूटपाट करण्याच्या प्रकरणात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी एका टोळीला जेरबंद केलं. बॉबी धोटे नावाचा आरोपी ही टोळी ऑपरेट करत होता. बॉबी धोटे हा कुख्यात आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.