Nagpur: बायको नवऱ्याला मुलाची लग्नपत्रिका द्यायला गेली, नवऱ्यानं मृत्यूचा अहेर दिल्यानं खळबळ!

Nagpur News : 32 वर्षांच्या सतीशचं लग्न होतं. बाबांनी लग्नाला यावं म्हणून सतीश वडिलांना निमंत्रण देण्यासाठी गेला होता. पण..

Nagpur: बायको नवऱ्याला मुलाची लग्नपत्रिका द्यायला गेली, नवऱ्यानं मृत्यूचा अहेर दिल्यानं खळबळ!
आधी मेव्हणीशी अवैध संबंध बनवले, मग लग्नाचा तगादा लावला म्हणून विळ्याने वार करत संपवले Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:33 AM

नागपूर : नवऱ्यापासून वेगळं राहत असलेली पत्नी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नवऱ्याकडे गेली. पण नवऱ्यानं धक्कादायक कृत्य केलं. नवऱ्यानं आमंत्रण देण्यात आलेल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं सपासप वार (Nagpur Murder) केले आणि तिला संपवलं. नागपुरात (Nagpur News) ही खळबळजनक घटना घडली. यामुळे सगळेच हादरले. लग्न अवघ्या पाच दिवसांवर आलेलं असताना घडलेल्या या घटनेन लग्नघरी शोककळा पसरली. अख्ख्या कुटुंबावर या घटनेनं शोककळा पसरली आहे. लकडगंड पोलीस ठाण्याच्य हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आता पोलीस (Nagpur crime) या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पतीपासून वेगळं राहत असलेली महिला मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन शनिवारी सकाळी पतीकडे गेली होती. छाया रामदार बोरीकर असं 52 वर्षीय महिलेचं नाव असून ती पती रामदास बोरीकर यांना निमंत्रण देण्यासाठी गेली होती. सातत्यानं वाद, भांडणं यांना कंटाळून 60 वर्षीय रामदार बोरीकर वेगळे राहत होते. 2017 पासून ते जुन्या घरी राहत होते. तर पत्नी छाया आपल्या दोन मुलांसोबत वेगळी राहत होती. सतीश बोरीकर आणि राकेश बोरीकर अशी दोन मुलांची नावं आहेत.

32 वर्षांच्या सतीशचं लग्न होतं. बाबांनी लग्नाला यावं म्हणून सतीश वडिलांना निमंत्रण देण्यासाठी गेला होता. पण वडिलांनी लग्नाला येण्यास नकार दिला. ही बाबत सतीशने आईला सांगितलं. अखेर आईनं मी त्यांना समजावते, असं म्हणत मुलाची समजूत काढली.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक कृत्य

शनिवारी (4 जून) सकाळी छाया दूध आमण्यासाठी घरातूल बाहेर पडल्या होत्या. तिथूनच त्या पतीला समजावण्यासाठी गेल्या. मुलाच्या लग्नासाठी यावं, असं आमंत्रण छाया यांनी पती रामदास यांना दिलं. त्यासाठी विनवणी केली. मात्र यावेळी दोघांमध्ये वाद झाला. पत्नीची भावना समजून घेणं दूरच, संतापलेल्या रामदास यांनी पत्नी छाया हीच्या चेहऱ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

पाहा व्हिडीओ : जेव्हा नाना पाटेकर अजित पवार यांच्याबाबत भाषणात बोलतात…

मुलाला ही बाब कळल्यानंतर सतीशने धाव घेत आईला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी उपचारासाठीच छाया यांना मृत घोषित केल्यानंतर मुलाच्याही पायाखालची जमीन सरकली. वडील असं काही करती याची पुसटशीही कल्पना मुलांना नव्हती. या घटनेनं लग्नघरात आनंदावर पाणी फेरलं गेलंय. संपूर्ण नागपूर या घटनेनं धास्तावलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.