महिला होमगार्डचा विनयभंग, नागपुरात पोलीस निरीक्षकावर गुन्हा

अशोक मेश्राम यांच्यावर ते कार्यरत असलेल्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

महिला होमगार्डचा विनयभंग, नागपुरात पोलीस निरीक्षकावर गुन्हा
महिला पोलिसाचा विनयभंग, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 12:42 PM

नागपूर : नागपूरमध्ये पोलीस निरीक्षकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (Ashok Meshram) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Nagpur Police Inspector Ashok Meshram suspended in Lady Homeguard Molestation Case)

नेमकं काय घडलं?

पोलीस निरीक्षकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर ते कार्यरत असलेल्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेश्रामांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

औरंगाबादच्या बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी केला होता. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

मुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

(Nagpur Police Inspector Ashok Meshram suspended in Lady Homeguard Molestation Case)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.