Nagpur Jail : मध्यवर्ती कारागृहात नागपूर पोलिसांचे सर्च ऑपरेशन, जेलमध्ये सापडला गांजा

जेलमध्ये एक पीएसआय सजा भोगत आहे. त्याचा सहभाग असल्याचं पुढे आलं. त्याचा भाऊ नागपूर पोलीस दलात आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. जेलमध्ये एक ऑपरेशन राबविण्यात आलं.

Nagpur Jail : मध्यवर्ती कारागृहात नागपूर पोलिसांचे सर्च ऑपरेशन, जेलमध्ये सापडला गांजा
मध्यवर्ती कारागृहात नागपूर पोलिसांचे सर्च ऑपरेशन, जेलमध्ये सापडला गांजा
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 3:45 PM

नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज नागपूर पोलिसांनी सर्च ऑपरेशन (Operation) केलं. यात जेलमध्ये 5 ग्राम गांजा सापडला. एका कैद्याला कोर्टात आणल्यानंतर तो जेलमध्ये जात होता. त्याच्याजवळ गांजा आणि 15 मोबाईल बॅटरी मिळून आल्या होत्या. त्यानंतर नागपूर पोलिसांनी आज सकाळी जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं. हे सगळ्यात मोठं ऑपरेशन होतं. 350 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी (Staff) यात सहभागी झाले होते. जेलमधील कैदाला कोर्टातून (Court) परत नेत असताना कैद्याकडे गांजा आणि 15 मोबाईल बॅटरी मिळाल्या होत्या. हे प्रकरण गंभीर होतं. त्यामुळे त्याला अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं.

सर्च ऑपरेशन राबविण्याचं कारण काय?

जेलमध्ये एक पीएसआय कारावास भोगत आहे. त्याचा सहभाग असल्याचं पुढे आलं. त्याचा भाऊ नागपूर पोलीस दलात आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. जेलमध्ये एक ऑपरेशन राबविण्यात आलं. यात एका आरोपीकडे 5 ग्राम गांजा मिळाला. 6 वाजतापासून 10.30 पर्यंत सर्च ऑपरेशन करण्यात आलं. जेलमध्ये अश्याप्रकारची कारवाई आवश्यक होती. त्यामुळे आम्ही जेल प्रशासनाची परवानगी घेऊन समन्वय साधत ऑपरेशन केलं. सुरक्षेत काही निगलिजन्सी आहे हे नक्की. या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली. हे प्रकरण गंभीर आहे. याची चौकशी केली जात आहे. यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

आणखी काय काय सापडणार?

साडेतीनशे पोलीस हे सर्च ऑपरेशन राबवित आहेत. त्यामुळं मध्यवर्ती कारागृहात काही अवैध धंदे सुरू असल्यास याची माहिती समोर येईल. विशेष म्हणजे हे ऑपरेशन राबविताना कारागृह प्रशासनाशी संगनमत करण्यात आलं. कारागृहातील जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गांजा जेलमध्ये जातो. यात काही कर्मचाऱ्यांचा हात आहे का, हेही तपासले जाईल. यापूर्वी या कारागृहात खर्रा सापडला होता. सिगारेट पुरविल्याची काही प्रकरणं उघडकीस आली होती. आता गांजा सापडला आहे. या सर्व प्रकाराकडं गांभीर्यानं पाहिलं जात आहे. स्वतः पोलीस आयुक्त याकडं लक्ष देऊन आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.