Nagpur Accident : नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन नाल्यात पडून अपघात! 18 विद्यार्थी थोडक्यात बचावले
Nagpur School Van Accident : नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्यावर व्हॅनचा हा अपघात झाला आणि व्हॅन नाल्या्चया किनाऱ्यावर घुसली.
नागपूर : नागपुरात स्कूल बसचा अपघात (Nagur Accident News) झाला. स्कूल व्हॅन नाल्यात पडली. मात्र या अपघातावेळी स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थी देखील होती. मात्र थोडक्यात या व्हॅनमधील विद्यार्थी सुखरुप बचावलेत. नागपूरच्या (Nagpur News) बेसा परिसरातील नाल्यावर व्हॅनचा हा अपघात (School Van Accident) झाला आणि व्हॅन नाल्या्चया किनाऱ्यावर घुसली. यात दोन मुलं किरकोळ जखमी झाली असून इतर सर्व मुलं बालंबाल बचावली आहेत. स्कूल व्हॅनच्या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचाही काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान, दोन मुलं यात किरकोळ जखमी झाली असून इतर सर्वजण सुरक्षित आहेत. पोलीस या अपघातस्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई केली जातेय. व्हॅनचं स्टेअरींग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहितीही समोर आली आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा प्रश्नही पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॅनमध्ये 21 विद्यार्थी व्हॅनमध्ये होते. आम्ही स्वतः 16 विद्यार्थ्यांना वाचवलं, असंही मदत करणाऱ्या लोकांनी सांगितलंय. 14 विद्यार्थ्यांना स्थानिकांनीच सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर पालकांकडे या विद्यार्थ्यांना सोपवण्यात आलं. दरम्यान, या मार्गावर होणाऱ्या अपघाताच्या भीतीपोटी आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, असं स्थानिकांनी म्हटलंय.
नियमांचं सर्रास उल्लंघन
शाळेच्या दहा ते बारा विद्यार्थ्यांना बसवण्याची क्षमता व्हॅनमध्ये आहे. पण व्हॅन चालक विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबलं जातं. या मार्गावर वाहतूक कोंडी होते. तीन महिन्यांपूर्वी याच मार्गावर एक मोठा अपघात झाला होता. शाळेच्या प्रमुखांनाही आम्ही फोन केला होता, पण त्यांच्याकडून कोणतही प्रत्युत्तर आलेलं नाही. त्यामुळे शाळेनंही व्हॅनची सुरक्षा किती आहे, याचा आढावा नियमित घेणं गरजेचं आहे. सकाळी आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक नागरीक असलेल्या राजेंद्र राजोळकर यांनी दिली.
किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीन रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, पोदार शाळेही ही व्हॅन असल्याचं सांगितलं जातंय. तर नाल्यात उलटलेल्या व्हॅनवर रोहन उच्च प्राथमिक विद्यालय असं लिहिल्याचं आढळून आलंय. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी वाहनं किती सुरक्षित आहेत, यावरुही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.
नागपुरात पाऊस जास्त झाल्यानं शाळेतील मुलांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन निघाली होती. त्यावेळी हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आता पोलिसांकडून सर्वच शाळेच्या स्कूल व्हॅनचं रजिस्ट्रेशन आणि त्याच्या सुरक्षेबाबत नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. या अपघातानंतर आता खबरदारी म्हणून स्कूल व्हॅनबाबत पोलिसांनी सुरक्षेच्या तपासीच्या दृष्टीने पावलं उचलण्यासही सुरुवात केल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालंय.