सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालताय? थांबा! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुत्र्यांना यापुढे सार्वजनिक ठिकाणी खाऊ घातलं तर काय होणार? हायकोर्टाने काय म्हटलं पाहा

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालताय? थांबा! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय, तर मग ही जबाबदारी तुमचीचImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 8:02 AM

गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना (Street Dogs) अनेकदा प्राणीप्रेमी (Dog Lovers) बिस्किटं किंवा इतर खाद्य खाऊ घालताना दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे यापुढे जर मोकाट कुत्र्यांना खाऊ घातलं, तर कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने (High Court orders) याबाबत महत्त्वाचा आदेश दिला आहे. यापुढे मोकाट कुत्र्यांना जर खायला घालायचं असेल तर त्यासाठी आधी पालिकेची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ न घालता मनपाच्या परवानगीनंतर घरी नेऊन त्यांना खायला घालावे, असं हायकोर्टाने म्हटलंय.

नागपुरातील मोकाट कुत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने कठोर पावलं उचलली आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्यानं हायकोर्टाने कठोर भूमिका घेत महत्त्वाचे आदेश दिलेत.

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खायला घालू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या प्राणीप्रेमींना कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे, त्यांनी मनपाची आधी परवानगी घ्यावी, त्यांनी कुत्र्यांनी घरी नेऊन खाऊ घालावे, असंही हायकोर्ट म्हणालंय.

हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मोकाट कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींवर निर्बंध येणार आहेत. फक्त इतकंच नाही, तर मोकाट कुत्र्यांवर कारवाई करताना प्राणीप्रेमींनी जर हस्तक्षेप केला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत.

नागपुरात महापालिका, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना मोकाट कुत्र्यांबाबत कायदेविषयक जनजागृती करावी, असे निर्देश हायकोर्टाने जारी केलेत. पोलिसांनी वेळोवेळी नोटीस काढावी आणि मोकाट कुत्रे रस्त्यावर दिसायला नको, असे नियम लावले जावेत, असंही हायकोर्ट म्हणालंय. शिवाय सरकारने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मंजूर केलेले 17 कोटी रुपये 8 आठवड्यांमध्ये मनपाला देण्याचे आदेशही दिले गेलेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.