Nagpur Suicide: नागपुरात निकीताची आत्महत्या! मुख्याध्यापक काका आणि प्राध्यापक काकीवर गुन्हा, त्यांनीच आत्महत्येला प्रवृत्त केलं?

Nagpur Crime News : तिने आपल्या आजी-आजोबांच्या घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली.

Nagpur Suicide: नागपुरात निकीताची आत्महत्या! मुख्याध्यापक काका आणि प्राध्यापक काकीवर गुन्हा, त्यांनीच आत्महत्येला प्रवृत्त केलं?
नागपूर आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:28 AM

नागपूर : नागपुरात एका 24 वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या (Nagpur Suicide News) केली. जुलै 14 रोजी आत्महत्या केलेल्या या 2 वर्षीय तरुणीचं नाव निकीता असून तिच्या आत्महत्येला जबाबदार कोण, यावरुन सवाल उपस्थित करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीच्या उच्च शिक्षित काका-काकींवर आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गळफास लावून घेत निकीतानं आपला जीव दिला होता. आपल्या आजीआजोबांच्या घरात तिनं आत्महत्या (Nagpur Crime News) केल्यानंतर एकच खळबळ उडालेली. दरम्यान, नैराश्यापोटी तिने आपली जीवनयात्रा संपवल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police) कॉलेजात मुख्यध्यापक असलेल्या निकिताच्या काकांवर आणि प्राध्यापिका असलेल्या तिच्या काकीवर गुन्हा नोंदवून घेतला आहे. निकिताच्या आत्महत्येला तेच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

काय आहे प्रकरण?

नागपूर शहरातली धापेवाडा इथं निकीता राहत होती. तिने आपल्या आजी-आजोबांच्या घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. 14 जुलै रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताला नैराश्य आलं होतं. विशेष म्हणजे ती प्रचंड घाबरलेली होती आणि तणावात होती. तिच्या काका-काकीने निकिताची खासगी डायरी वाचली होती. यानंतर तिच्या काका-काकींना तिच्याबाबत काही धक्कादायक बाबी कळल्या होत्या. यानंतर काका काकी तिला धमकावत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

कोण आहेत काका-काकी?

निकिताच्या काकांचं नाव डॉ. रत्नाकर रामजी दहाट असून ते नागपूरच्या चक्रपाणी कॉलेजात मुख्याध्यापक आहेत. तर त्यांची पत्नी मंगला ही संताजी कॉलेजात प्राध्यापिका आहे. हे दाम्पत्य नागपूरच्या सुयोग नगरमध्ये राहतं, अशी माहिती सावनेर पोलिसांनी दिली. निकिता ही सायन्स ग्रॅच्युएट होती. ती एका खासगी कंपनीत काम करत होती.

हे सुद्धा वाचा

निकीताच्या काका काकीने एप्रिल महिन्यात तिची डायरी वाचली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. काका-काकी आपली बदनामी करतील, अशी भीती निकीताला वाटत होती. याबाबत तिनं आपल्या भावालाही सांगितलं होतं. दरम्यान, प्रचंड मानसिक तणावात असलेल्या निकीताने अखेर गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता तिच्या काका-काकींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जातोय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.