CCTV : नागपूरचे चोरटे करामती, भक्त दान करण्यात दंग, चोरट्यांचा थेट मंदिरातच ‘हुडदंग’! व्हिडीओ बघा, पोलिसांना कळवा

Nagpur theft CCTV : 11 एप्रिल रोजी ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दोघे जण एका गेटवरुन आत जात असल्याचं दिसतंय. पहाटे सीडेतीन वाजण्याच्या सुमारात दोघेजण आतमध्ये प्रवेश करतात

CCTV : नागपूरचे चोरटे करामती, भक्त दान करण्यात दंग, चोरट्यांचा थेट मंदिरातच 'हुडदंग'! व्हिडीओ बघा, पोलिसांना कळवा
मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 5:52 PM

नागपूर : नागपुरात चोरट्यांचा (Nagpur Theft) सुळसुळाट पाहायला मिळतोय. नागपूरच्या मंदिरात चोरांनी (Nagpur Mandir Theft) दानपेटीच चोरुन नेली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. चोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. मंदिरातील दानपेटीच चोरांनी पळवून नेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली आहे. नागपूरच्या नंदनवर परिसरामध्ये. नागपूरच्या नंदनवन परिसरात हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्यावेळी कुणीही नाही, हे पाहून चोरांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे बाहेर येऊन पसार झाले आहे. या संपूर्ण चोरीप्रकरणी दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये (CCTV of Theft) संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं घडलं काय होतं?

11 एप्रिल रोजी ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दोघे जण एका गेटवरुन आत जात असल्याचं दिसतंय. पहाटे सीडेतीन वाजण्याच्या सुमारात दोघेजण आतमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर चार वाजून सहा मिनिटांनी एक जण बाहेर येतो.

याच चोरीच्या घटनेच्या आणखी एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये गेटच्या बाहेर आलेला एक व्यक्ती दुचाकीवर बसतो आणि तिथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ एक भगव्या रंगांचं शर्ट घातलेला व्यक्तीही चालत जाताना दिसून आला आहे. यावेळी रस्त्यावर दुसरं कुणीही नसल्यानं नेमकी चोरी कुणी केली आहे, याबाबतही संभ्रम आहे.

चोरांना पकडण्याचं आव्हान

मात्र यानंतर काही वेळानं आणखी एक दुचाकी जाताना दिसते. सीसीटीव्हीमध्ये ही दुचाकी कैद झाली असून गेटच्या आतून हे जणही हळूच बाहेर येतानाही दिसले आहेत. हा संपूर्ण चोरीचा प्रकार पाहिल्यांतर आता चोरांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

रामनमवी झाल्यानंतर आता अनेक मंदिरांमध्ये हनुमान जयंतीची तयारी सुरु आहे. मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मंदिरातील दानपेट्या कितपत सुरक्षित आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.