Nagpur : नागपुरातून पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तिघापैकी दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

Nagpur Drowned : सचिन कुंभारे आणि विजय सरदार हे दोघेही जण आषाढी निमित्त पंढरपूर एकत्र आले होते.

Nagpur : नागपुरातून पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तिघापैकी दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
दुर्दैवी घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:27 AM

नागपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur) विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपुरातील (Nagpur Crime News) दोघा तरुणांचा करुण (Two young boys drowned) अंत झाला. चंद्रभागा नदीच्या पाण्यात वाहून गेल्यानं दोघा तरुणांची मृत्यू झालाय. रविवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. सचिन शिवाजी कुंभारे आणि विजय सरदार अशी दोघा तरुणांची नावं आहेत. हे दोघेही मित्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर अंघोळ करावी म्हणून ते नदीत गेले. यावेळी नदीच्या प्रवाहाचा अंदाज दोघाही मित्रांना आला नाही आणि ते वाहून गेले. यात दोघाची मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसंच या दोघाची तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत कळल्यानंतर मोठा धक्का बसलाय. सचिन शिवाजी कुंभारे (28) आणि विजय सरदार (27) अशी मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावं आहेत.

सचिन कुंभारे आणि विजय सरदार हे दोघेही जण आषाढी निमित्त पंढरपूर एकत्र आले होते. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्यांनी नागपुरातून रेल्वेने प्रवास करत पंढरपूर गाठलं होतं. रविवारी सकाळी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी आधी अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते दोघंही नदीत अंघोळ करण्यासाठी उतरले. पण दोघांचाही पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. हे दोघेही तरुण नरखेड तालुक्यातील जलालखेडा आणि नारसिंगी येथील रहिवासी होते.

तिघे गेले होते, दोघे बुडाले

सचिन आणि विजय यांच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही सोबत होते. आपले दोन मित्र बुडत आहेत, हे पाहून तिसऱ्या मित्राने आरडाओरडा केला. आधी सचिन पाण्यात उतरला होता. त्याला नदीच्या वाढलेल्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला. सचिनला वाचवण्यासाठी विजयही नदीत उतरला. पण दोघंही वाहून जात आहेत, हे लक्षात आल्यावर तिसऱ्या मित्राने किनाऱ्यावरुनच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिसऱ्या मित्राला पोहण्यास येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी मदतीसाठी जोरजोराने आवाज दिला.

हे सुद्धा वाचा

कुणीतरी ओरडतंय हे पाहून स्थानिकांनी किनाऱ्याजवळ धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आणि तातडीने रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण तिथे दोघांनीही डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याप्रकरणी आता पंढरपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.