Video : महिला झेडपी सदस्याच्या पतीची शिव्या देत तरुणांना मारहाण, नागपूरच्या उमरेड परिसरात राडा

Nagpur young Beaten: व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणून पैशांवरुन काहीतरी प्रश्न उपस्थित करताना दिसतो. यात प्रश्न ज्याला उपस्थित करण्यात आला, त्यानं आम्ही स्वखुशीनं पैसे देतो, असं उत्तर दिलंय.

Video : महिला झेडपी सदस्याच्या पतीची शिव्या देत तरुणांना मारहाण, नागपूरच्या उमरेड परिसरात राडा
नागपुरातील मारहाणाची घटना कॅमेऱ्यात कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 8:45 PM

नागपूर : झेडपी सदस्य (ZP Member) असलेल्या महिलेच्या पतीनं युवकाला मारहाण (Nagpur Youth Beaten) केली. हा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूर जिल्ह्यामधील उरमेड परिसरात ही घटना घडली. आंबेडकर जयंतीच्या (Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary) वर्गणीच्या विषयावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन नंतर शिविगाळ करत मारहाण करण्यात आली. यावेळी एका तरुणाला काही जण मिळून मारहाण करत असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी अश्लील शिविगाळही तरुणाला करण्यात आली. तू भांडण करायला आला आहेस का, असा प्रश्न एकानं विचारला. त्यावर तुम्ही पैसे घेऊन काय करत आहात, असाही प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात आला बोता. दरम्यान, ‘आम्ही स्वखुशीनं पैसे देत आहोत’, असं सांगितल्यानंतरही या इसमाला मारहाण करण्यात आली. यावेळी झेडपी सदस्यासोबत आलेल्यांनीही मारहाण केली आहे. चार पाच जणांनी एकत्र मिळून ही मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्काबुक्की करत काही जणांनी या दोघांना रस्त्यावर आपटलं. त्यानंतर काहींनी यांचे हात पकडून ठेवत त्यांना एकामागून एक प्रहार केलेत. यावेळी डोक्यासह शरीरावर लाथाबुक्क्यांनी प्रहार करण्यात आली.

व्हिडीओमध्ये काय दिसलं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणून पैशांवरुन काहीतरी प्रश्न उपस्थित करताना दिसतो. यात प्रश्न ज्याला उपस्थित करण्यात आला, त्यानं आम्ही स्वखुशीनं पैसे देतो, असं उत्तर दिलंय. यावर समोर असलेल्या जमावातील एक व्यक्ती संतापते. संतापलेल्या व्यक्तीनं अश्लील शिविगाळ करत प्रतिउत्तर देणाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं दिसून आलं आहे. एक व्यक्ती ही सगळी घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत असतो.

यानंतर जमावातील काही लोक दोघा तिघांना मारहाण करताना दिसतात. जमावातील काहींनी एका व्यक्तीला जमिनीवर पाडलं. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर इतर एकाचे हात पकडून ठेवण्यात आले होते. यानंतर काही जणांनी आळीपाळीनं त्यांनी मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेत एक गाडी असल्याचं दिसून आलंय. या गाडीचाही आवाज व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो आहे. संध्याकाळच्या वेळेस भररस्त्यात ही मारहाण करण्यात आली.

कारवाई कधी?

व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर आता ही मारहाण कुणी केली, हेही स्पष्ट झालं आहे. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांच्या पतीनं ही मारहाण केली असल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.