दोन गटांमध्ये वाद, चहा पिता पिता केला घात, नेमकं काय घडलं?

बारसेनगरात सविता पाटील यांची चहाची दुकान आहे. शंकी चहाच्या टपरीत चहा पित बसला होता.

दोन गटांमध्ये वाद, चहा पिता पिता केला घात, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 7:42 PM

नागपूर : पाचपावली परिसरात एका चहाच्या टपरीवर मृतक शंकी भोयर हा चहा पीत बसला होता. तेवढ्यात दोन ते तीन युवक तिथे आले. आरोपी आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते. मात्र जुना वाद होता. आरोपी आणि मृतक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर आरोपींनी शंकी याला हातबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यानंतर एकाने चाकू काढून त्याच्यावर वार केले. मृतक रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपीने पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरु केला. ही घटना लव्ह ट्रँगल आणि जुन्या वादातून घडल्याचं पुढं आलं.

लव्ह ट्रँगलमधून खून

पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश डोंगरे म्हणाले, सव्वादोन वाजता घटनेची माहिती मिळाली. शंकी भोयर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. आम्ही घटनास्थळाला भेट दिली. शंकी भोयर याचा मृतदेह सापडला. त्याचा खून करण्यात आला. खून करणारे तीन लोकं होते. सुरुवातीला हाताबुक्यांनी आणि नंतर चाकूने खून केला. गळ्यावर, छातीवर आणि पोटावर वार करण्यात आले आहेत. जुना वाद होता. लव्ह ट्राँगलमधून हा खून झाल्याची माहिती आहे.

दोन्ही गट गुन्हेगारी प्रवृत्तीचे

बारसेनगरात सविता पाटील यांची चहाची दुकान आहे. शंकी चहाच्या टपरीत चहा पित बसला होता. लव्ह ट्राँगल आणि जुन्या वादातून खून केला. मृतक आणि आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मृतक हा रुग्णालयाजवळ वेटरचं काम करत होता. रात्रीची ड्युटी करून तो आला होता. मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत भर दिवसा एकाची हत्या करून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली. शंकी भोयर अस मृतकाचे नाव आहे. पावपावलीसारख्या भरगच्च गर्दीच्या परिसरात भर दिवसा ही घटना घडली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.