Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : नागपुरात मित्राला कुटुंबासह जेवायला घरी बोलावले, मग त्याच्या घरी जाऊन सोन्याचे दागिने चोरले; आरोपी अटक

जेवण झाल्यावर मित्र जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घरात चोरी झाल्याचं उघड झालं. त्याने तात्काळ पाचपावली पोलिस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.

Nagpur Crime : नागपुरात मित्राला कुटुंबासह जेवायला घरी बोलावले, मग त्याच्या घरी जाऊन सोन्याचे दागिने चोरले; आरोपी अटक
नागपुरमध्ये मित्रानेच केली मित्राच्या घरी चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:12 PM

नागपूर : मित्रा (Friend)ला स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं आणि त्याच्या बंद असलेल्या घरात जाऊन सोन्याच्या दागिन्यांसह इतर सामानाची चोरी (Theft) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत मित्राच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Arrest) केली आहे. कैलास निमजे असे आरोपी मित्राचे नाव आहे. निमजे याने कोणत्या कारणातून मित्राच्याच घरी चोरी केली, याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत. मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर फिर्यादी मित्रालाही धक्का बसला.

मित्राला घरी बोलावलं आणि अर्जंट काम आहे सांगत घराबाहेर गेला

एका मित्राने आपल्या मित्राला परिवारासहित घरी जेवायला बोलावल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र मित्राला आपल्या घरी बोलावून त्याच्या घरी चोरी करण्याची घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. मित्राने मित्राला घरी जेवायला बोलावलं आणि स्वतः त्याच्या घरी जाऊन चोरी केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आरोपी कैलास निमजे याने आपल्या मित्राला परिवारासहित आपल्याकडे जेवायला बोलावलं. मित्र परिवारासहित त्याच्या घरी जोवायला आला. त्यानंतर कैलासने त्याला मला एक अर्जंट काम आल्याच सांगत आपल्याच घरी थांबवून तो बाहेर पडला. मित्राच्या घरी जाऊन त्याच्या घराचे कुलूप उघडून त्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. नंतर आपल्या घरी परत येऊन मित्रासोबत जेवण केलं.

पाचपावली पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जेवण झाल्यावर मित्र जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घरात चोरी झाल्याचं उघड झालं. त्याने तात्काळ पाचपावली पोलिस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान फिर्यादीच्या मित्रानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या चोर मित्राला अटक केली आहे. या घटनेमुळे एका मित्राचा मित्रावरचा विश्वास उडला. मात्र नेहमी सुखदुःखात सोबत राहणाऱ्या मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. (Pachapavali police arrested the accused who stole from a friends house in Nagpur)

हे सुद्धा वाचा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.