कार भाड्याने घ्यायचा आणि दुसऱ्याला विकायचा, महाभाग असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनीही संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्या कार दुसऱ्यांना परस्पर विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कार भाड्याने घ्यायचा आणि दुसऱ्याला विकायचा, महाभाग असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 5:55 PM

नागपूर : चोरी करणारा क्लुप्त्या शोधत असतो. तसेच पोलीसही शेरास सव्वाशेर असतात. एका चोरट्याने कार चोरीचा सपाटा लावला. त्या कार चोरी करून तो विक्री करत असे. काही कार तर गहाण ठेवून पैसे मिळवत असे. अशा चोरट्याला जरीपटका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सौरभ मनोज दरेकर यांचा कार किरायाने देण्याचा व्यवसाय आहे. प्रखर तिवारी हा कार भाड्याने नेत असे. सुरुवातीला काही दिवस त्यांनी कार परत आणून देत विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर तो कारचे भाडेही देत नसे. तसेच कारही परत करायला टाळाटाळ करू लागला. त्यामुळे दरेकर यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी जरीपटका पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्या कार दुसऱ्यांना परस्पर विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

१३ कार केल्या जप्त

पोलिसांनी आतापर्यंत 13 कार जप्त केल्या आहेत. प्रखर तिवारी याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. तपास जरीपटका पोलीस करत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. काईट यांनी ही माहिती दिली.

महाभाग आला पोलिसांच्या जाळ्यात

नागपुरातील असा हा चोर तर चोर पण शिरजोर असलेला महाभाग आता पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांना संशय आहे की त्याने आणखी काही लोकंसोबतसुद्धा असा व्यवहार केला असावा. आणखी कार मिळण्याची शक्यता आहे.

प्रखर तिवारी असं त्याचं नाव

कार भाड्याने घ्यायची आणि ती परत न देता दुसऱ्याला विकायची. अशा या चोरट्यास नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी अटक केली. त्याने एक-दोन नाही तर 13 महागड्या कार विकल्या, तर काही गहाण ठेवल्या. प्रखर तिवारी असं या महाभाग चोरट्याचं नाव आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.