Nagpur smuggling : दुबईवरून नागपुरात सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्मगलिंग, मजुरांचा चोरीसाठी वापर

दुबईवरून सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्मगलिंग नागपुरात करण्यात येते. नागपूर हा स्मगलिंगचा नवा मार्ग तयार झाला असल्याचं समोर आलं. यात स्मगलिंगसाठी लेबर क्लास लोकांचा वापर केल्या जातो. नागपूर पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.

Nagpur smuggling : दुबईवरून नागपुरात सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्मगलिंग, मजुरांचा चोरीसाठी वापर
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 6:15 PM

नागपूर : दुबईवरून नागपूरला (Dubai to Nagpur) सरळ फ्लाईट सुरू झाली. मात्र या फ्लाईटनं स्मगलिंग (smuggling) करणाऱ्यांसाठी नवीन मार्ग तयार झालाय. नागपूर पोलिसांनी एका रॉबरीच्या गुन्ह्यात राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील काही लोकांना अटक केली. त्यांच्याकडे काही आयफोन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य (electronic goods) दुबईवरून आणल्याचं उघड झालं. तपासात पोलिसांना काही माहिती मिळाली.त्यावरून काल नागपूर विमानतळावर एक गोपनीय टीम तैनात केली होती. त्यामध्ये नागोर जिल्ह्यातील काही लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे मोठ्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य होतं. लोखंडी हातोड्या असे अनेक साहित्य त्यांच्याकडे सापडले. मात्र त्यांनी ते कसं काय आणलं, यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं . त्यामुळे त्या हातोड्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली. हातोड्यांच्या आत 347 ग्रॅम सोनं मिळून आलं. ते सोनं जप्त करण्यात आलं.

कस्टम कायद्यानुसार गुन्हा

मजुरांनी कस्टम ड्युटी चुकवून हे सोनं आणलं. त्यामुळं कस्टम ऍक्टप्रमाणे तो गुन्हा आहे. त्याची माहिती कस्टमला दिली जात आहे.दुबईमध्ये बसलेल्या काही लोकांनी स्मगलिंगसाठी नागपूरची निवड केली. त्या माध्यमातून सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्मगलिंग केली जात आहे. त्याचा तपास आम्ही करत आहोत, असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अशी केली जाते हेराफेरी

या स्मगलिंगसाठी लेबर क्लास लोकांचा वापर केला जात असल्याचं सुद्धा समोर येतंय. ते नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांना एक फोटो दिला जातो. त्या व्यक्तीकडे ते सामान सुपूर्त करायचं असतं. एअरपोर्टला उतरल्यानंतर पार्किंग एरियामध्ये जाऊन बॅग एक्सचेंज केली जाते. नागपूरला उतरल्यानंतर या लोकांचं ट्रेनचं तिकीट राजस्थानसाठी दुबईमधून बुक केल्याचं सुद्धा समोर आलं. एक-दीड महिन्यापासून दुबईवरून नागपूरला रेगुलर फ्लाईट सुरू झालं. तेव्हापासून या ऍक्टिव्हिटी वाढल्या. नागपूर पोलिसांनी आता याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.