AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Drugs : वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात नागपूर पोलिसांनी कसली कंबर, पोलिसांना विशेष प्रशिक्षण

युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाची समस्या ही नागपुरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे.

Nagpur Drugs : वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात नागपूर पोलिसांनी कसली कंबर, पोलिसांना विशेष प्रशिक्षण
वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात नागपूर पोलिसांनी कसली कंबरImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 3:02 PM
Share

नागपूर : ड्रग तस्कर आणि वाढती व्यसनाधीनता यावर निर्बंध आणण्यासाठी आता नागपूर पोलिस काकांनी कंबर कसली आहे. यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण (Police Training) दिलं जात आहे. नागपूर शहरात गांजा, ड्रग्स, चरस आणि ब्राऊन शुगरच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. या वर्षाच्या सात महिन्यात अंमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाने एकूण 113 गुन्ह्यांची नोंद केली असून, तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त (Seized) करण्यात आले आहेत. नागपूर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी सात महिन्यात एकूण 113 गुन्ह्यांची नोंद केली तर एकूण 172 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर कोट्यवधींचे ड्रग जप्त केले आहे. त्यामुळे नागपूर हे ड्रग तस्करांचं हब बनत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलीस काकांच्या मदतीने अंमली पदार्थांविषयी जनजागृती करणार

युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाची समस्या ही नागपुरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे. पोलीस काकांच्या मदतीने नागपूर शहरातील विविध शाळा, कॉलेज, स्लम वस्तीत जाऊन जनतेमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगितले जाणार आहेत. सुरवातीला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत 135 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूर शहरातील दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा, झोपडपट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य या समस्यांचा सामना नागपुरात निर्माण झाल्या आहेत. यामध्ये ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा वाढता वापर समाजासाठी फारच घातक ठरत असल्याने नागपूर पालिसांनी शहराला ड्रग्स मुक्त करण्यासाठीचं पोलीस काका ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईचे व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुजा हे मार्गदर्शन करत आहेत. मात्र पोलिसांनी आता कंबर कसली असली तरी त्यांना कितपत यश मिळत हे सुद्धा पाहावं लागणार आहे. (Special training for Nagpur police to prevent increasing addiction)

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.