Nagpur Cheating : नोकरीच्या नावाखाली फसवणूक, बदल्यात आरोपीने इतरांना गंडा घातला, असा फसला पोलिसांच्या जाळ्यात

आरोपीने फिर्यादीला दुकान विकत घेण्यासाठी 70 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र तो चेक कॅश झाला नाही तेव्हा फिर्यादी सचिनला आरोपीवर संशय आला.

Nagpur Cheating : नोकरीच्या नावाखाली फसवणूक, बदल्यात आरोपीने इतरांना गंडा घातला, असा फसला पोलिसांच्या जाळ्यात
दारु विक्री परवाना देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:36 PM

नागपूर : स्वतःची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक (Fraud) झाली, म्हणून आरोपीने इतरांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. दारू विक्रीचा परवाना (Permit) मिळवून देण्याच्या नावावर आरोपीने लोकांची फसवणूक केली. सक्करदार पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. शुभम नदीश्वर शहा असे आरोपीचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील रहिवासी आहे. त्याने आतापर्यंत मुंबई, पुणे, साताऱ्यात सुद्धा अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत आपला खाक्या दाखवताच शुभमने गुन्ह्याची कबुली दिली.

असा फसला पोलिसांच्या जाळ्यात

सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरात फिर्यादी सचिन बेलेचे झेरॉक्स दुकान आहे. आरोपी शुभम सचिनच्या दुकानात नेहमी झेरॉक्स काढण्यासाठी यायचा. त्यामुळे त्याची थोडीफार ओळख झाली होती. एक दिवस सचिनने कागदपत्रे कशाची असल्याची विचारणा शुभमकडे केली. शुभमने सांगितले की, मी राज्य उत्पादन शुल्क विभागात म्हणजेच एक्ससाईस विभागात नोकरीला होतो. मात्र, मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता लोकांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो. सचिनचा विश्वास बसावा यासाठी आरोपीने खोटी वर्दी देखील दाखवली. आरोपी शुभमने फिर्यादी सचिनला दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे आश्वासन देऊन सुमारे अडीच लाख रुपये वसूल केले. आरोपीने फिर्यादीला दुकान विकत घेण्यासाठी 70 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र तो चेक कॅश झाला नाही तेव्हा फिर्यादी सचिनला आरोपीवर संशय आला. त्याने यासंदर्भात सक्करदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना फसवणुकीचा प्रकार उजेडात आला आहे. (The accused who cheated to get liquor license was arrested by the police)

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.