Nagpur Crime : नागपूरमध्ये वनविभागाकडून व्हेल माशाची उलटी जप्त, चार आरोपी ताब्यात

वनविभागगाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारी टोळी नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने सापळा रचला. यावेळी नागपुरात शहरातल्या गणेशपेठ परिसरात चार जण संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.

Nagpur Crime : नागपूरमध्ये वनविभागाकडून व्हेल माशाची उलटी जप्त, चार आरोपी ताब्यात
नागपूरमध्ये वनविभागाकडून व्हेल माशाची उलटी जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:01 PM

नागपूर : वनविभागाकडून कोट्यवधी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीस (Ambergris) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपुरात चार तस्करां (Smugglers)ना वनविभागाने सापळा रचून ताब्यात (Detained) घेतले. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहुल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यावधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस अतिशय दुर्मिळ पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यवधीत आहे. समुद्रातील सोनं किंवा तरंगणारा सोनं असेही म्हणतात. महागडे परफ्युम आणि औषधांकरता अंबरग्रीसचा खास करून वापर करण्यात येतो.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले

वनविभागगाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारी टोळी नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने सापळा रचला. यावेळी नागपुरात शहरातल्या गणेशपेठ परिसरात चार जण संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहुल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने या चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दुर्मिळ असं अंबरग्रीस जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करांची चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याचे तपासात समोर येत आहे. जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसची बाजारात किंमत कोट्यावधी असल्याचे वनविभागाने सांगितले. (The forest department seized whale vomit and arrested four accused in Nagpur)

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.