Nagpur Thief Arrest : मुंबईतील चोरी करुन पलायन करणाऱ्या चोरट्याला अटक, नागपूर रेल्वे पोलिसांची कारवाई

उडिसामध्ये राहणारा आरोपी अनेक स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला होता. मुंबईत त्याला फिल्म सिटीमध्ये जायचं होतं पण ते होऊ न शकल्याने तो रिक्षा चालक बनला.

Nagpur Thief Arrest : मुंबईतील चोरी करुन पलायन करणाऱ्या चोरट्याला अटक, नागपूर रेल्वे पोलिसांची कारवाई
मुंबईतील चोरी करुन पलायन करणाऱ्या चोरट्याला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 11:03 PM

नागपूर : मुंबईतील सांताक्रुझ पोलीस स्टेशन हद्दीत चोरी (Theft) करून रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या एका आरोपीला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपीकडून चार लाख रुपये नगदी कॅश (Cash) आणि इतर खात्यामध्ये त्याने पैसे वर्ग केल्याच्या रिसिप्ट हस्तगत केल्या. मित्राच्या घरी राहूनच त्याने 13 लाख रुपयांची चोरी केली होती आणि आपल्या उडीसा राज्यात पळून जाण्यास निघाला होता. मात्र त्याचा डाव फसला आणि पोलिसांच्या बेड्या हातात पडल्या. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा उडिसा येथील रहिवासी असून, मुंबईत कामानिमित्त आला होता.

मित्राने घर घेण्यासाठी जमवलेले पैसे आरोपीने चोरले

उडिसामध्ये राहणारा आरोपी अनेक स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला होता. मुंबईत त्याला फिल्म सिटीमध्ये जायचं होतं पण ते होऊ न शकल्याने तो रिक्षा चालक बनला. रिक्षा चालवत असताना तो एका मित्रासोबत एकाच रूममध्ये रहायचा. त्याच्या मित्राला घर घ्यायचं असल्यामुळे त्याने 13 लाख रुपये घरी आणून ठेवले होते आणि तो ड्युटीवर गेला होता. मित्र ड्युटीवर गेल्यानंतर आरोपीने 13 लाख रुपये चोरले. मात्र एवढे पैसे घेऊन मुंबईहून उडीसापर्यंतचा प्रवास करणे सोपे होणार नाही म्हणून त्याने काही पैसे आईच्या तर काही पैसे पत्नीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. उर्वरीत चार लाख रुपये कॅश घेऊन तो रेल्वेने उडिसाकडे निघाला.

नागपूर पोलिसांनी ट्रॅप लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

मित्र ड्युटीवरुन घरी आल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे त्याला कळले. तसेच त्याच्यासोबत राहणारा मित्रही गायब होता. त्याने तात्काळ सांताक्रुझ पोलिसात धाव घेत पैसे चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन सांताक्रुझ पोलिसांनी तात्काळ आरोपी पळाल्याची माहिती सर्व पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार नागपूर रेल्वे पोलिसांनी ट्रॅप रचला आणि ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकात येताच त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे चार लाख रुपये रोख आणि इतर पैसे ट्रान्सफर केल्याच्या रिसिप्ट असा एकूण 13 लाख रुपयांचा हिशोब मिळून आला. रेल्वे पोलिसांनी त्याला आता सांताक्रुझ पोलिसांच्या हवाली केला आहे. (The thief who escaped after stealing from Mumbai was arrested in Nagpur)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.