पत्नी पतीला घेऊन घराबाहेर गेली, त्यानंतर घरात चोरी झाली; तरीही पत्नीवर संशय कसा?

सोन्या चांदीच्या दागिन्यासह जवळपास 14 लाखाचा मुद्देमाल चोरी गेला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. घरातील सगळे सीसीटीव्ही तपासले आणि हळूहळू चोरीच गूढ उकलत गेलं.

पत्नी पतीला घेऊन घराबाहेर गेली, त्यानंतर घरात चोरी झाली; तरीही पत्नीवर संशय कसा?
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 6:17 PM

नागपूर : नागपुरात एक अजब घटना घडली. नवरा बायको घरी राहत होते. सुखाचा संसार सुरू झाला. काही दिवसांपूर्वी पतीचा अपघात झाला. तेव्हापासून बायकोला तिच्या जुन्या प्रियकराची आठवण आली. तिने लग्नापूर्वीच्या प्रीयकरासोबत एक प्लॅन केला. त्यानुसार, सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे चोरी झाली. यात सोन्या चांदीच्या दागिन्यासह जवळपास 14 लाखाचा मुद्देमाल चोरी गेला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. घरातील सगळे सीसीटीव्ही तपासले आणि हळूहळू चोरीच गूढ उकलत गेलं.

पत्नी पतीला घेऊन घराबाहेर गेली

पोलिसांना सुरवातीपासूनच तक्रारदाराच्या पत्नीवर संशय वाटत होता. मात्र त्यांना पुरावा मिळत नव्हता. पोलिसांनी घटनेचा बारीक तपास केला. तेव्हा पुढे आलं की, घटनेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला बाहेर घेऊन गेली. प्लॅननुसार चोराला म्हणजे पत्नीच्या आधीच्या प्रियकराला घरात कुठे काय ठेवलं आहे त्याची सगळी माहिती दिली होती. प्लॅननुसार हे दोघे बाहेर जाताच तो घरात शिरला.

प्रियकर आला चोरी करून गेला

काही वेळात ठरल्याप्रमाणे त्याने सगळं मुद्देमाल लंपास केला. मात्र सीसीटीव्हीमध्ये तो छत्री घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. रामटेक तालुक्यातील त्याच्या घरी पोलीस पोहचले. त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्या चांदीचे दागिने सापडले. मात्र कॅश घेऊन पळण्यात आरोपी यशस्वी झाला. पोलिसांनी एकएक खुलासा करत तक्रारदाराच्या पत्नीसह एकाला अटक केली. पत्नीनेसुद्धा गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र चोरी करणारा अजून फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. अशी माहिती सदरचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.

तेव्हापासून तिचे पतीकडे दुर्लक्ष

एका पत्नीने आपल्या लग्नाआधीच्या मित्राला टीप देऊन स्वतःच्या घरात 14 लाखांची चोरी करवून घेतली. मात्र आता या पत्नीला जेलची हवा खावी लागणार आहे. पतीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. तेव्हापासून पत्नी पतीकडे दुर्लक्ष करत होती. तिने आपल्या जुन्या मित्राच्या साह्याने हा प्लॅन आखला. स्वतःच्याच घरात चोरी करून घेतली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.