Nagpur Crime : बंद घरात अंधाराचा फायदा घेत घुसले, मात्र सीसीटीव्हीने चोरी पकडलीच !

पोलिसांनी घराच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता दोन चोरटे मोटरसायकलवरून जाताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Nagpur Crime : बंद घरात अंधाराचा फायदा घेत घुसले, मात्र सीसीटीव्हीने चोरी पकडलीच !
नागपूरमध्ये बंद घरात दागिन्यांसह रोख रकमेची चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 7:32 PM

नागपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बंद घरात घुसून दोन चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नागपूरमधील सोनगाव परिसरात उघडकीस आली आहे. घरातील सर्व जण बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली. मात्र चोरटे घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे सोनेगाव पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

घरातील सर्वजण पुण्याला गेले होते

सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बद्रीनाथ सोसायटी पराते लेआउट या ठिकाणी विनायक भारती यांचं घर आहे. विनायक भारती आपल्या कुटुंबासह तीन दिवसासाठी पुण्याला मुलाकडे गेले होते.

घरात कुणीही नसल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे घुसले

याच काळामध्ये चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यांच्या घरात घुसून चोरी केली. भारती हे पुण्याहून परत आले असता त्यांना घराचं दार उघडं दिसलं. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु

पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत पंचनामा केला असता सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम घरातून चोरी झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी घराच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता दोन चोरटे मोटरसायकलवरून जाताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

गोंदियात तोतया पोलिसाने दागिने पळवले

पोलिस किंवा सीआयडीच्या अधिकारी असल्याची बतावणी करत लोकांजवळील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू त्यांच्या नजरेआड चोरून नेल्याच्या अशा दोन घटना घडल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथे या घटना घडल्या आहे. या दोन्ही घटनांत दोन लाखांवरील ऐवज चोरून नेण्यात आला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.