Nagpur Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कामगाराचे साहित्य चोरले, आरोपी अटक
सोनू वर्मा याने पाचपावली परिसरातील एका शाळेत नळ दुरुस्तींचं काम घेतलं होतं. त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असताना चार युवक आले आणि त्यांनी काम करणाऱ्याकडे दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे चारही जण रागावले आणि निघून गेले.
नागपूर : आजकाल कोणत्या कारणासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. दारू (Liquor) प्यायला पैसे दिले नाही म्हणून चक्क एका कामगाराचं साहित्य चोरलं. त्यामुळे आता प्रत्येकाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दिले नाही म्हणून चार आरोपींनी चक्क कामगाराचं साहित्य चोरून (Theft) नेल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक (Arrest) केली असून सगळं साहित्य हस्तगत केलं आहे. सोनू गणेश वर्मा असे लुटण्यात आलेल्या कामगाराचं नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदवण्यात आली होती. (Thieves stole workers’ supplies because he did not pay for alcohol)
पाचपावली पोलिसांकडून आरोपींना अटक
सोनू वर्मा याने पाचपावली परिसरातील एका शाळेत नळ दुरुस्तींचं काम घेतलं होतं. त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असताना चार युवक आले आणि त्यांनी काम करणाऱ्याकडे दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे चारही जण रागावले आणि निघून गेले. मात्र काम संपल्यानंतर फिर्यादीने आपलं सगळं साहित्य काम सुरू असलेल्या शाळेच्या एका खोलीत ठेवलं आणि निघून गेला. मात्र आरोपी त्याच्यावर लक्ष ठेवून होते, त्यांनी तो जाताच लगेच शाळेचं दार तोडलं आणि सगळं साहित्य चोरून नेलं. दुसऱ्या दिवशी फिर्यादी आला असता त्याला साहित्य दिसलं नसल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी परिसरात सर्च केलं असता चार आरोपी संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या जवळील साहित्य हस्तगत करत चारही आरोपींना अटक केली.
फिंगर प्रिंटच्या आधारे नागपूरच्या चोरट्याला अकोल्यातून अटक
फिंगर प्रिंटचा आधार घेत नागपूर पोलिसांनी अकोल्यातून एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक करत बराच मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हाताला लागत नव्हते. पोलिस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होते. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या सोबत पोलिसांनी दोन साथीदारांनाही अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. (Thieves stole workers’ supplies because he did not pay for alcohol)
इतर बातम्या
4 कोटी 20 लाखांच्या हवालाच्या पैशांचा तपास ईडीकडे? नागपूर पोलिसांचं पत्र