Nagpur Crime : वयोवृद्ध महिलांची फसवणूक करुन दागिने लुटणारे चोरटे जेरबंद, नागपूरच्या पाचपावली पोलिसांची कारवाई

ही टोळी शहरात सुनसान ठिकाणी फिरायची. वयोवृद्ध महिलांना गाठायची. त्यांना बोलण्यात गुंग करुन त्यांचा विश्वास संपादन करायची आणि त्यानंतर त्यांच्या जवळचे दागिने मागायची.

Nagpur Crime : वयोवृद्ध महिलांची फसवणूक करुन दागिने लुटणारे चोरटे जेरबंद, नागपूरच्या पाचपावली पोलिसांची कारवाई
वयोवृद्ध महिलांची फसवणूक करुन दागिने लुटणारे चोरटे जेरबंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 12:51 AM

नागपूर : वयोवृद्ध महिलांची फसवणूक (Cheating) करुन त्यांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना जेरबंद (Arrest) करण्यास नागपूर पोलिसांना यश आले आहे. हे चोरटे वृद्ध महिलांना एकटे गाठून त्यांना बोलण्यात गुंग करायचे. मग त्यांच्या हातात पैशाचा बंडल द्यायचा आणि त्यांच्याकडे असलेले दागिने (Jewellery) लुबाडून पळून जायचे. मात्र बंडलमध्ये दिलेल्या पैशात कागद असायचे. अशाच एका टोळीतील सदस्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आंतरराज्यीय टोळी असून या टोळीने अनेक शहरात अशा प्रकारच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरुन पाचपावली पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केले.

एका महिलेच्या तक्रारीवरुन टोळीचा पर्दाफाश

ही टोळी शहरात सुनसान ठिकाणी फिरायची. वयोवृद्ध महिलांना गाठायची. त्यांना बोलण्यात गुंग करुन त्यांचा विश्वास संपादन करायची आणि त्यानंतर त्यांच्या जवळचे दागिने मागायची. त्यांना हातामध्ये रुमालात गुंडाळलेला पैशाचा बंडल द्यायचे आणि लगेच तिथून रफू चक्कर व्हायचे. दागिने हातात आलेले असायचे मात्र जेव्हा ती महिला बंडल उघडून बघायची तर त्यामध्ये वरती काही नोटा आणि खाली कागद असायचे. अशाच एका तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेत मध्य प्रदेशातील दोघांना अटक केली आहे. त्यांचा तपास केला असता त्यांनी अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे लूट केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.

फेक वेबसाईटवरुन फसवणूक करणारी गँग अटक

फेक वेबसाईटवरुन लोकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केले आहे. मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. नागपूरमधील एका उद्योजकाच्या कंपनीची फेक वेबसाईट बनवून आरोपी ग्राहकांची फसवणूक करत होते. एका ग्राहकाला ऑर्डर केलेली वस्तू न मिळाल्याने त्याने व्यावसायिकाशी संपर्क साधला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना दिल्लीतून अटक केली. (Thieves who cheated elderly women and stole jewelery arrested)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.