Nagpur Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, पण पोलिसांना कुणकुण लागली अन्…

नागपूरमधील हायप्रोफाईल परिसरात धक्कादायक प्रकार सुरु होता. घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. नोकरीचे आमिष दाखवून परराज्यातील मुली येथे आणल्या जात होत्या.

Nagpur Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, पण पोलिसांना कुणकुण लागली अन्...
नागपूरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाशImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 9:01 PM

नागपूर / 18 ऑगस्ट 2023 : नागपूरच्या सदर परिसरात स्पा च्या आडून सुरू असलेल्या देह व्यापारावराचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईदरम्यान पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील तीन महिला आणि तीन युवतींची पोलिसांनी सुटका केली. या देहव्यापार प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूरचा सदर हा परिसर नामांकित परिसर असून, या ठिकाणी स्पाच्या आडून देह व्यापाराचा सर्रास धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. या स्पा चा मालक हा मुंबईचा रहिवासी असून, तो नागपुरात हा व्यवसाय चालवत होता.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

सदर परिसरातील या स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या देहव्यापारासाठी वेगवेगळ्या राज्यातील मुली आणि महिला आणण्यात येत होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्लॅनिंग करत डमी ग्राहक त्या हॉटेलच्या स् मध्ये पाठवला. सगळा व्यवहार फिक्स केला आणि त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.

कारवाई दरम्यान अनेक आक्षेपार्ह वस्तू या ठिकाणी पोलिसांना मिळून आल्या. त्याचप्रमाणे तीन मुली आणि तीन महिला सुद्धा या ठिकाणी दिसून आल्या. या महिला आणि मुली पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील असल्याचे पुढे आलं या महिलांची आणि मुलींची सुटका करून पोलिसांनी स्पा चा मॅनेजरसह दोन जणांना अटक केली. सदर सारख्या पॉश वस्तीमध्ये हा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच या ठिकाणी येणारे कस्टमर हे नियमित स्वरूपाचे आणि ओळखीचे असायचे. त्यामुळे बाहेर माहिती जाण्याची भीती कमी होती, मात्र आता यांच बिंग फुटलं आहे.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.