Nagpur Crime | नागपुरात दोन मित्रांचे भांडण, सागरचे समरपालवर चाकूने सपासप वार, रात्री 12 वाजता नेमकं काय घडलं?
सागर गुलदेवकर हा रात्री बारा वाजता समरपालच्या घरी आला. तो जोराजोरानं समरपालशी भांडू लागला. या भांडण्याचा आवाज शेजाऱ्यांना गेला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता आहे. सागरने सोबत चाकू आणला होता. त्यामुळं त्यानं चाकूनं समरपालवर सपासप वार केले. यात समरपालच्या पोटावर गंभीर जखम झाली. त्यानंतर सागर पळून गेला. हा थरार सविता तोमर यांनी पाहिला. त्यानंतर सविता यांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविलं.
नागपूर : गोरेवाडा (Gorewada) येथील समरपाल रघुवीर तोमर (Samarpal Tomar) (वय 27) व सागर गुलदेवकर (Sagar Guldevkar) (वय 30) हे दोन्ही मित्र. गेल्या महिन्यात समरपाल व सागर यांच्यात भांडण झाले. सागरच्या मनात याचा भांडणाचा राग होता. याच रागातून 8 जून रोजी तो रात्री 12 ते सव्वाबाराच्या दरम्यान समरपालच्या घरासमोर पेठेसूर जुनी वस्तीत आला. समरपाल हा घरी खाटेवर झोपला होता. सागरकडं चाकू होता. त्या धारदार चाकूनं समरपालच्या पोटावर त्याने सपासप वार केले. घरच्यांनाही चाकूचा धाक दाखविला. दोघांनाही मारण्याची धमकी दिली. समरपालला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. समरपाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समरपालची पत्नी सवितानं दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी सागरविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
रात्री 12 वाजता नेमकं काय घडलं
सागर गुलदेवकर हा रात्री बारा वाजता समरपालच्या घरी आला. तो जोराजोरानं समरपालशी भांडू लागला. या भांडण्याचा आवाज शेजाऱ्यांना गेला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता आहे. सागरने सोबत चाकू आणला होता. त्यामुळं त्यानं चाकूनं समरपालवर सपासप वार केले. यात समरपालच्या पोटावर गंभीर जखम झाली. त्यानंतर सागर पळून गेला. हा थरार सविता तोमर यांनी पाहिला. त्यानंतर सविता यांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविलं. तसेच समरपाल यांना मेयो रुग्णालयात दाखलं केलं.
सागर गुलदेवकरला अटक
सागरनं चाकूनं वार केल्यानंतर तो तिथून पळून गेला. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी सागरचा शोध घेतला. काल सकाळी सागरला बेड्या ठोकल्या. छोट्याशा कारणावरून तो जीवावर का उठला याची चौकशी आता गिट्टीखदान पोलीस करत आहेत. या घटनेनं समरपालची पत्नी हादरून गेली. तिला काही सुचत नव्हतं. आता ती जखमी पत्नीसोबत आहे. पण, सागरला पोलिसांनी चांगली अद्दल घडविली पाहिजे, अशी तिची तक्रार आहे.
जखमीची प्रकृती गंभीर
समरपाल जखमी आहे. त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोटावर चाकूने वार केल्यानं तो उपचार घेत आहे. तर, त्याचा जुना मित्र, आताचा शत्रू पोलिसांच्या ताब्यात आहे. एक मित्र रुग्णालयात, तर दुसरा कैदेत आहे. गुन्हा केल्यानंतर दोघांचंही कसं नुकसान होतं, हे यातून दिसून येतं.