Nagpur Crime : नागपूर पुन्हा हादरले, क्षुल्लक कारणातून 24 तासात दोन हत्या

नागपूरमध्ये गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. दररोज होणाऱ्या हत्याकांडाने नागपूर हादरले आहे.

Nagpur Crime : नागपूर पुन्हा हादरले, क्षुल्लक कारणातून 24 तासात दोन हत्या
दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 9:19 AM

नागपूर / 3 ऑगस्ट 2023 : नागपुरात हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज या ना त्या कारणांनी हत्येच्या घटना वाढत आहेत. गेल्या 24 तासात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पाचपावली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत या हत्या झाल्या. प्रेम प्रकरणाच्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. तर दुसरी घटना घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. हत्येच्या घटनांनी नागपूर पुन्हा हादरले आहे. वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे दिसून येते.

प्रेमाच्या त्रिकोणातून मित्राने मित्राला संपवले

प्रेमाच्या त्रिकोणातून मित्राने मित्राची दिवसाढवळ्या हत्या केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अभिनव महेंद्र भोयर असे मयत तरुणाचे नाव आहे. तर कशिश महाजन असे आरोपीचे नाव आहे. अभिनव एका हॉटेलमध्ये काम करायचा. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र कशिशलाही ती मुलगी आवजच होती. यामुळे तरुणीला अभिनवपासून वेगळे करण्याच्या उद्देशाने भडकावले. परिणामी तरुणीने अभिनवसोबतचे प्रेमसंबंध तोडले. यानंतर आरोपीने तरुणीसोबत प्रेमसंबंध जोडले.

अभिनवला मित्राचे कृत्य कळल्यानंतर त्याने कशिशसोबत बोलणे बंद केले. मात्र अभिनव तरुणीवर प्रेम करतच होता. कशिशला याबाबत कल्पना असल्याने त्याने अभिनवला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर त्याने ही धमकी खरी करुन दाखवत अभिनवची हत्या केली. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवले

दुसऱ्या घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसी नीलडोह येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी नागरिकांना रात्री 8 च्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. महिलेच्या डोक्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.