Nagpur Railway : पत्नी सोडून गेली, नात्यातील युवतीवर जीव जडला, अखेर प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली घेतली उडी

स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. कधी-कधी त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, समाजानं त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता दिली नाही.

Nagpur Railway : पत्नी सोडून गेली, नात्यातील युवतीवर जीव जडला, अखेर प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली घेतली उडी
प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली घेतली उडी
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 7:03 PM

नागपूर : पत्नी सोडून गेली. घरी पाहुणी म्हणून आलेल्या पुतणीवर जीव जडला. त्यांच्या नातेसंबंधाला समाजमान्यता नव्हती. त्यामुळं दोघांनीही रेल्वेखाली उडी मारून जीव दिला. नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर दोघांचे मृतदेह सापडले होते. या प्रेमीयुगुलानं आत्महत्या केली. अशी उकल आता हिंगणा पोलिसांनी (Hingana Police) केली आहे. मृतक जितेंद्र कांशीराम नेवारे (Jitendra Neware) (वय 32 वर्षे) हा मानकापुरातील (Mankapur) बाबा फरीदनगरचा. स्वाती (वय 18) (नाव बदललेलं) ही गोंदिया जिल्ह्यातील. जितेंद्र हा विवाहित आहे. वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. त्यामुळं तो आईसोबत एकटाच राहत होता. त्यात पाहुणी म्हणून नात्यातील स्वाती आली.

विचार करून घेतला घातक निर्णय

स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. कधी-कधी त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, समाजानं त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता दिली नाही. त्यामुळं त्यांच्यावर रेल्वेखाली जीव देण्याचे संकट कोसळले. स्वातीला भेटायला जितेंद्र गोंदियाला गेला. 30 ऑगस्टला तो नागपूरला परत आला. 31 ऑगस्टला स्वातीसुद्धा नागपूरला आली. 1 सप्टेंबर रोजी सकाळी दोघेही घराबाहेर पडले. त्यानंतर सकाळी आठ वाजतानंतर त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले. जितेंद्रच्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणून तिने हरवल्याची तक्रारसुद्धा पोलिसात दिली नव्हती.

असा लावला पोलिसांनी छडा

हिंगणा पोलिसांना जितेंद्रच्या मोबाईलचा मदर बोर्ड सापडला. तांत्रिक व सायबर विभागाची मदत घेतली. मोबाईलच्या आधारे मानकापूर भागात जितेंद्रच्या घराचा शोध लावण्यात आला. जितेंद्रची आई लक्ष्मी नेवारे हिला सोबत घेतले. मृताची ओळख करून घेतल्या. मुलगी ही स्वाती असल्याचे सांगितले. गोंदिया येथे तिच्या आईवडिलांना कळविण्यात आले. दोन्ही मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.