Nagpur Crime : ऑनलाइन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मैत्री, मग भेटायला बोलावले अन्… वाचा नागपुरात काय घडले?

आरोपी आणि फिर्यादी तरुणाची ऑनलाइन मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यातून आरोपींनी फिर्यादी तरुणाला भेटण्यासाठी नंदनवन हद्दीत सूत गिरणीच्या बाजूच्या झाडी झुडपात बोलावले होते. पीडित तरुण ठरल्या ठिकाणी आरोपींना भेटायला आला. यावेळी आरोपींनी बळजबरीने पीडित तरुणाशी अनैसर्गिक संबंध बनवले.

Nagpur Crime : ऑनलाइन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मैत्री, मग भेटायला बोलावले अन्... वाचा नागपुरात काय घडले?
ऑनलाइन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मैत्री, मग भेटायला बोलावले अन्...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:18 PM

नागपूर : ऑनलाईन अॅप्लीकेशन (Online Application)च्या माध्यमातून झालेली मैत्री नागपुरातील एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणावर संगनमताने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Relation) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात असून दोन्ही आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. आवेश मिर्झा आणि अनिल उईके अशी अटक झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

ऑनलाईन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित तरुणाची मैत्री

आरोपी आणि फिर्यादी तरुणाची ऑनलाइन मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यातून आरोपींनी फिर्यादी तरुणाला भेटण्यासाठी नंदनवन हद्दीत सूत गिरणीच्या बाजूच्या झाडी झुडपात बोलावले होते. पीडित तरुण ठरल्या ठिकाणी आरोपींना भेटायला आला. यावेळी आरोपींनी बळजबरीने पीडित तरुणाशी अनैसर्गिक संबंध बनवले. यानंतर पीडित तरुणाने नंदनवन पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करत अहवाल बघून दोन्ही आरोपींना अटक केली. कमी वयातील मुलं मोबाईल वापरतात वेगवेगळे अप्लिकेशन्स उघडतात. त्यामुळे त्यातून अनेक गोष्टी घडतात. मात्र या सगळ्या बाबी टाळण्यासाठी पालकांनी मुलांकडे ते वापरत असलेल्या मोबाईलकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. (Unnatural abuse of youth by friends introduced through online application in nagpur)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.