एक्स बॉयफ्रेण्डशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीला प्रियकराने विहिरीत ढकलून ठार मारलं

दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या रागातून एखा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केलीये. घटनेच्या चार ते पाच दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला असून गुन्हेगार प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील आर्वीमध्ये ही घटना घडलीय | Wardha Boyfriend Killed Minor Girlfriend

एक्स बॉयफ्रेण्डशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीला प्रियकराने विहिरीत ढकलून ठार मारलं
Boyfriend Killed Minor Girlfriend
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 8:56 AM

वर्धा : दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या रागातून एखा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केलीये. घटनेच्या चार ते पाच दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला असून गुन्हेगार प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील आर्वीमध्ये ही घटना घडलीय (Wardha Boyfriend Killed Minor Girlfriend Because She Talked With Her Ex Boyfriend).

पूर्वीच्या प्रियकरासोबत बोलत असल्याचा राग

अजय आत्राम असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे. त्याचं आर्वी शहरातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण होत. 23 जूनला प्रियकराने रात्री दोन वाजताच्या सुमारास मुलीला भेटायला बोलावले. प्रियकर आणि मुलगी दोघेही भेटले. दरम्यान दोघांमध्ये मुलीच्या पूर्वीच्या प्रियकरासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यावेळी प्रियकराने अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली.

प्रथमदर्शी आत्महत्येचा अंदाज

रात्री झोपेतून उठलेल्या आईला मुलगी घरात न दिसल्याने तिने याची माहिती वडिलांना दिली. रात्रीच मुलीचा शोधाशोध सुरु झाला. मुलगी मिळाली नाही, मात्र तिचा दुपट्टा विहिरीजवळ दिसून आला. यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आटमहत्या केली असावी असा अंदाज लावण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ गीठलं आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रेमप्रकरणाचा छोटासा धागा पोलिसांच्या हाती आणि गुन्हेगार ताब्यात

या घटनेचा तपास सुरु असतानाच पोलिसांना मुलीच्या नोटबुकमध्ये काही प्रेमसंबंधीचा मजकूर, एका मुलाचे नाव आणि एक मोबाईलनंबर आढळला. या आधारे पोलिसांनी तीन लोकांना विचारपूस करण्याकरता ताब्यात घेतले. यातीलच एक अजय आत्राम याने हत्या केल्याची कबुली दिली.

सोबतच त्याने मुलीसोबत प्रेमसंबंध असून ती जुन्या प्रियकरासोबत बोलत असल्याने हे त्याला आवडत नव्हते म्हणून त्याने हत्या केल्याची कबुली दिलीय. प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या चार ते पाच दिवसांनी घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा छोटासा धागा पकडून गुन्हेगार शोधत त्यास अटक केलीय.

Wardha Boyfriend Killed Minor Girlfriend Because She Talked With Her Ex Boyfriend

संबंधित बातम्या :

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.