तो तिला जंगलात घेऊन गेला, ‘ती’ तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार; पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तेव्हा…

२३ मार्चला तो तिला घेऊन हिंगणा हद्दीतील जंगलात घेऊन गेला. तिथं त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला दगडाने ठेचले. इकडे ती घरी आली नव्हती.

तो तिला जंगलात घेऊन गेला, 'ती' तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार; पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तेव्हा...
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:38 AM

नागपूर : दिघोरीतील एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध होते. त्याला तिचे आणखी कुणाशीतरी अफेअर असल्याचा संशय होता. तू माझ्याशी फिरायला येते आणि दुसऱ्याशी असलेले संबंध त्याला पसंत नव्हते. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. २३ मार्चला तो तिला घेऊन हिंगणा हद्दीतील जंगलात घेऊन गेला. तिथ त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला दगडाने ठेचले. इकडे ती घरी आली नव्हती. त्यामुळे घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

बेपत्ता महिलाचा मृतदेह सापडला

नागपुरात प्रियकराने जंगलात नेऊन केली महिलेची हत्या केली. वाठोडा परिसरातून 45 वर्षीय श्वेता (नाव बदललेलं) महिला मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तीन दिवसानंतर बेपत्ता महिलेचा मृतदेह हिंगणा हद्दीत बनवाडी शिवार येथे आढळला. आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली.

NAG 2 N

हे सुद्धा वाचा

श्वेता त्याच्याशी फोनवर बोलत होती

श्वेता ही ४५ वर्षीय महिला दिघोरीत राहत असे. तिची दीपक इंगळे या ४० वर्षीय तरुणासोबत जवळीकता होती. श्वेताला कुटुंबात पती, मुलगा आणि मुलगी आहे. दीपक हा स्टार बसमध्ये चालक आहे. श्वेता त्याच्याशी नेहमी फोनवर बोलत असे. शिवाय तो तिच्या घरीही येत होता. तो मानलेला भाऊ असल्याचं घरी सांगायची.

दीपकला तिचे आणखी कुणाशीतरी संबंध असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे तो संतापला होता. २३ मार्चला तो श्वेताला घेऊन रूई शिवारात गेला. त्यांच्यात वाद झाला. यातून दीपकने श्वेताच्या कपाळावर डाव्या बाजूला मारून हत्या केली.

श्वेता बेपत्ता असल्याची तक्रार

इकडे श्वेता बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी २४ मार्च रोजी वाठोडा पोलिसांत केली होती. दीपकवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला.

आठवड्यापूर्वीही दीपकने श्वेताला त्या जंगलात नेले होते. पण, यावेळी तो संपवेल, याची पुसटशी कल्पना तिला नव्हती. २३ मार्चला दीपकने श्वेताला जंगलात संपवले होते. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.